येवला(वेबटीम) संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या धरणग्रस्त सेवा संघ येवला व कोपरगाव तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्य...
येवला(वेबटीम)
संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या धरणग्रस्त सेवा संघ येवला व कोपरगाव तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहे. या भागात सेवा संघाचे कार्य जोमाने वाढविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.
धरणग्रस्त सेवा संघाच्या महाराष्ट्र अध्यक्ष अँड. सिंड्रेला परेरा यांच्या सहीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यावेळी सागर सावंत उपस्थित होते.
नूतन पदाधिकाऱ्यांत नाशिक जिल्हाध्यक्षपदी गणेश खळे यांची निवड करण्यात आली आहे. तर येवला तालुकाध्यक्षपदी दामू माळी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तर पारेगाव शाखाध्यक्षपदी सचिन वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संपुर्ण महाराष्ट्र भर धरणग्रस्त सेवा संघ भूमिहीन, अल्पभूधारक, गायरान जमीन धारक, गोरगरीब , दिन दुबळ्या व शोषित समाजासाठी काम करत असून येवला तालुक्यातील नवीन पदाधिकारी यांनी तळागाळातील नागरिकांशी संपर्क करून त्यांना या प्रवाहात समविष्ट करावे असे आवाहन महाराष्ट्र अध्यक्षा अँड. सिंड्रेला परेरा यांनी यावेळी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत