राहुरी(वेबटीम) राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या तडकाफडकी बदलीच्या निषेधार्थ राहुरी येथे उद्या शनिवार २४ डिसेंबर रोजी सकाळी १० ...
राहुरी(वेबटीम)
राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या तडकाफडकी बदलीच्या निषेधार्थ राहुरी येथे उद्या शनिवार २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राहुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक दराडे यांच्या बदलीनंतर राहुरी तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राहूरीतील सर्वपक्षीय नेत्यांनी उद्या शनिवारी सकाळी राहुरी बाजार समिती समोर सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.
या आंदोलनात राहुरी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांची सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एम.डी. सोनवणे, शहराध्यक्ष संतोष आघाव तसेच ओबीसी सेलचे अध्यक्ष महेश उदावंत यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत