आंबी(वेबटीम) राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, वेतनश्रेणी, निवृत्तीवेतन याबाबत लवकरच बैठक बोलावून त्या मार्गी लावल्य...
आंबी(वेबटीम)
राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, वेतनश्रेणी, निवृत्तीवेतन याबाबत लवकरच बैठक बोलावून त्या मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती नाशिक विभागीय सदस्य तथा राहुरी तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामदास ससाणे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने नागपुरातील डोंगरगाव येथे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू, जळगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार सुधीर पारवे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी संघटनेचे राज्य अध्यक्ष विलास कुमरवार व राज्य सरचिटणीस गिरीश दाभाडकर यांनी प्रास्ताविकात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांचा पाढा वाचला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मागील थकबाकी वेतन फरकासह देण्यात यावी, नगरपरिषद, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी, निवृत्तीवेतन व उपदान योजना लागू करावे आदींकडे लक्ष वेधले या सहकार्य केले.
अधिवेशनाला राज्यभरातून सुमारे ३० हजार ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी राज्य कार्याध्यक्ष काजी अल्लाउद्दीन, राज्य सचिव दिलीप डिके, अमर नेहे, संदिप जेऊघाले, ज्ञानदेव डुकरे, गोरक्षनाथ गुंड, वेणूनाथ हिवाळे, रामदास ससाणे, विजय शिंदे, शरद पवार, शिवाजी मंडलिक, अशोक जगधने, हरिभाऊ अचपळे, सुभाष शेंडगे, बाबासाहेब मोरे, भीमा माळी, अर्जुन साळे, सिकंदर शेख, सुनिल भांड, अरुण वडीतके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत