राहुरी(वेबटीम) राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची बदली तातडीने रद्द करावी या मागणीचे निवेदन आज राहुरी येथील विकास मंडळाचे अध्यक्ष ...
राहुरी(वेबटीम)
राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची बदली तातडीने रद्द करावी या मागणीचे निवेदन आज राहुरी येथील विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी व व्यापारी वर्गाने नगर येथे महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांना दिले आहे.
या निवेदनात म्हंटले की, राहुरी तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श् प्रताप दराडे यांची बदली झाली असल्याने राहुरी तालुक्यातील मोठया प्रमाणावर नाराजी निर्माण झाली आहे. राहुरी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था पुनर्स्थापित करणा-या चांगला अधिका-यांची बदली करण अयोग्य आहे. तसेच त्यांचा मागील कार्यकाळ पाहता त्यांनी १० महिन्याच्या कालावधीत राहुरी शहारातील व तालुक्यातील गुन्हेगारी मोडीत काढली आहे.अशा कर्तव्यदक्ष अधिक यांची झालेली बदलीमुळे राहुरी शहर व तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करीत असून पोलिस निरीक्षक श्री. प्रताप दराडे यांची बदली स्थगित करून पुन्हा राहुरी तालुक्यात नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर विकास मंडळ अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, रावसाहेब राधुजी तनपुरे, राजेंद्र उंडे, नयन शिंगी, सुनील पवार, नयन शिंगी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत