राहुरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथे डी पॉल इंग्लिश मेडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. जॉय मॅडम स्मृती पुरस्काराने...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथे डी पॉल इंग्लिश मेडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. जॉय मॅडम स्मृती पुरस्काराने दहावीच्या पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या शाळेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे, देशाचे भविष्य घडविण्याचे काम सुरू आहे. असे प्रसिद्ध उद्योजक अशोक कानडे यांनी सांगितले.
राहुरी फॅक्टरी येथे काल (गुरुवारी) रात्री डी पॉल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन व बक्षीस वितरण प्रसंगी कानडे बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक निखिल चौरे होते. देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी अजित निकत, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, नगरसेवक अमोल कदम, मुसळवाडीचे सरपंच अमृत धुमाळ, प्राचार्य फादर सॅन्टो, फादर हेबिक, फादर जेम्स उपस्थित होते.
उपप्राचार्य (स्व.) साराम्मा जॉय यांच्या स्मृतिप्रत्यर्थ दहावीच्या पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांना "जॉय मॅडम स्मृती गुणवंत विद्यार्थी पुरस्कार" देण्यास सुरुवात झाली. यंदाच्या वर्षातील विद्यार्थी सिद्ध शिवाजी घुले (९७.८%), जिया मयुरेश अग्रवाल (९५.६%), सानिया इक्बाल शेख (९३.२%), प्रणव विलास कल्हापुरे (९२.८%), भक्ती विजय वरघुडे (९२.४%) यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कानडे म्हणाले, "केवळ पुस्तकी ज्ञानाने व्यक्तिमत्व घडत नाही. कला, क्रीडा, साहित्य अशा सर्वांगीण विकासाने व्यक्तिमत्व घडते. डी पॉल स्कूलमध्ये असे गुणवंत विद्यार्थी व देशाचे भविष्य घडविण्याचे काम सुरू आहे." निकत म्हणाले, "शाळेच्या स्थापनेपासून २८ वर्षात हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत."
संसारे म्हणाले, "तालुक्यातील सर्वात मोठी व उत्कृष्ठ इंग्रजी माध्यमाची शाळा असा नावलौकिक प्राप्त आहे. प्राचार्य फादर सॅन्टो यांनी शाळेच्या वार्षिक प्रगतीचा अहवाल सादर केला. विद्यार्थ्यांनी विविध नृत्य-नाट्य अविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत