राहुरी(वेबटीम) प्रचंड इच्छाशक्ती,ध्येयवेड्या मनोबलाच्या पाठिंब्यावर दोन आकाश वीरांनी अतुलनीय साहस दाखवीत आपले ईप्सित साध्य केले,ते धाडस इत...
राहुरी(वेबटीम)
प्रचंड इच्छाशक्ती,ध्येयवेड्या मनोबलाच्या पाठिंब्यावर दोन आकाश वीरांनी अतुलनीय साहस दाखवीत आपले ईप्सित साध्य केले,ते धाडस इतके मोठे होते की त्याची नोंद विश्वविक्रम करणाऱ्या महत्वाच्या संस्थांना घ्यावीच लागली. आकाशात अंधारात ५००० हजार फूट उंचावर पॅराग्लायडिंगच्या सहायाने हवाई सफर करणाऱ्या पुणे येथील पद्मश्री शीतल महाजन व उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या धैर्यधील कामगिरीची इंडिया वर्ल्ड व आशिया बुकमध्ये नोंद झाली आहे.
महिला दिन व भारतीय स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ८ मार्च २०२२ रोजी पद्मश्री शीतल महाजन व उद्योजक विजयकुमार सेठी मोठे धाडस करून रात्रीच्या वेळी अंधारात ५००० फूट आकाशात उंच उडी घेतली.
रात्रीच्या वेळी अंधारात पॅराग्लायडिंगच्या सहायाने उडी घेऊन सफर करणे ही अवघड बाब असताना पद्मश्री शीतल महाजन व उद्योजक विजयकुमार सेठी यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर हा प्रवास पूर्ण केला.
पॅराग्लायडिंग करताना जीपीएस, होकायंत्र अथवा कुठलेही पर्याय नसतो.अंधारात लँडिंग करताना अडचण निर्माण होत असते तरी त्यावर मात करून आम्ही सुखरूप लॅन्ड झालो असे विजय सेठी यांनी सांगितले.
पद्मश्री शीतल महाजन यांनी हा विक्रम मराठी सांस्कृति जपत व आपल्या मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत केला.प्याराग्लायडिंग करताना पाश्चिमात्य पेहराव आवश्य असताना मराठी सहावार साडीत उड्डाण घेऊन लँड होणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
पद्मश्री शीतल महाजन व उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या धैर्यधील कामगिरीची इंडिया वर्ल्ड व आशिया बुकमध्ये नोंद झाली असून भारतातील पहिला विक्रम आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.म्हणतात ना की. गगन भरारीचे वेड रक्तातच असावे लागते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत