राहुरी/वेबटीम:- राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची आज नागपूर हिवाळी अधिवेशनातील लक्षवेधी नंतर तातडीने अहमदनगर मुख्यालयात बदली करण्या...
राहुरी/वेबटीम:-
राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची आज नागपूर हिवाळी अधिवेशनातील लक्षवेधी नंतर तातडीने अहमदनगर मुख्यालयात बदली करण्यात आली.या बदलीनंतर राहुरीतील विविध संघटना, पक्ष व नागरिक यांच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच आरपीआयचे सचिन साळवे,वंचित आघाडीचे पिंटू नाना साळवे,जय भीम क्रांती सेनेचे सुभाष संसारे यांनी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणानंतर पोलीस प्रशासनाची एकच धांदल उडाली राहुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन तिघांना आत्मदहन करण्यापासून रोखले.
आत्मदहनाचा प्रयत्न करणारे सचिन साळवे यांच्यावर भावबंधकीच्या वादावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा अनेक वर्षांपासून प्रलंबित असताना पोलीस निरीक्षक दराडे यांनी या प्रकरणी सचिन साळवे यांना अटक केली होती. तब्बल एक महिना साळवे यांना जेलची हवा खावी लागली होती. तरीही दराडे यांची बदली रद्द व्हावी यासाठी सचिन साळवे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत