देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा ते लेण्याद्री, शिवनेरी, माळशेज घाट, श्री विघ्नेश्वर ओझर गणपती असा एकूण ३४० किलोमीटरचा प्रवास अवघ्या...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा ते लेण्याद्री, शिवनेरी, माळशेज घाट, श्री विघ्नेश्वर ओझर गणपती असा एकूण ३४० किलोमीटरचा प्रवास अवघ्या ३ दिवसात पूर्ण करणारे देवळाली प्रवरा सायकलिंग अॅन्ड ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य देवळाली प्रवरा येथील नगरपरिषदेचे जेष्ठ कर्मचारी अशोकराव जाधव, संभाजी वाळके, राहुल दुधाडे, अमोल दातीर यांचा सन्मान देवळाली प्रवरा येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेली शाल व श्रीफळ देवून केला.
दि. २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देवळाली प्रवरा येथून या टीम ने सकाळी ०५.०० वा. शिवनेरी गडाकडे प्रस्थान केले. सायंकाळी ०६.०० वाजता १३० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करून श्री क्षेत्र लेण्याद्री याठिकाणी पोहोचले. दुसऱ्या दिवशी श्री क्षेत्र लेण्याद्री - शिवनेरी किल्ला – गणेश खिंड – माळशेज घाट – ते ओझर असा जवळपास ८० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करून पोहचले. तिसऱ्या दिवशी श्री क्षेत्र ओझर ते देवळाली प्रवरा असा जवळपास १०६ किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करून देवळाली प्रवर या गावी सुखरूप पोहोचले.
यावेळी बोलताना ग्रुपचे सदस्य म्हणाले की, ३४० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार केल्यानंतर आमच्यासाठी हा अनुभव हा खूपच छान होता. या पुढेही आम्ही नित्यनियमाने असे उपक्रम सुरु ठेवणार आहोत.
यावेळी राजेंद्र शेरकर, नितीन वाळूंज, रमेश देठे, मंगेश ढूस, अनिकेत देठे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत