देवळाली प्रवरा(वेबटीम) गेल्या ८१ वर्षापूर्वी स्थापन केलेल्या पोपट भगिरथ महाले(सराफ) यांनी देवळाली प्रवरात आपल्या शाखेचा शुभारंभ केला असून...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
गेल्या ८१ वर्षापूर्वी स्थापन केलेल्या पोपट भगिरथ महाले(सराफ) यांनी देवळाली प्रवरात आपल्या शाखेचा शुभारंभ केला असून विश्वासहर्ता, शुध्दता व विविधता हीच त्यांची ओळख असल्याचे प्रतिपादन शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष तथा माजी आ. चंद्रशेखर कदम यांनी केले.
देवळाली प्रवरा येथे पोपट भगिरथ महाले(सराफ) दालनाचा शुभारंभ करताना माजी आ.चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम समवेत ओम महाले व परिवार( छाया-अजय अहिरे)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील काकासाहेब चौक येथे नववर्षाच्या मुहूर्तावर पोपट भगिरथ महाले या दालनाचा शुभारंभ माजी आ.कदम यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रसंगी श्री.कदम बोलत होते.यावेळी देवळाली प्रवराचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन शहाजी कदम, बागायत पीक सोसायटीचे उपाध्यक्ष मच्छींद्र कदम, केरु पठारे, माजी नगरसेवक शिवाजी मुसमाडे, तनपुरे कारखान्याचे संचालक अशोक खुरुद, स्वराज्य ट्रेडर्सचे किशोर गडाख, किरण लासुरकर आदी उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत ओम महाले यांनी केले.
पुढे बोलताना माजी आ. कदम म्हणाले की, कुठलाही व्यवसाय हा विश्वासावर वृद्धिंगत होत असतो. पोपट भगिरथ महाले यांनी श्रीरामपूरसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आपल्या शाखा सुरू सुवर्णसेवा देण्याचे प्रामाणिकपणे काम करत आहे.
देवळाली प्रवरा शहर परिसरातील आर्थिक सुबत्ता लक्षात घेऊन महाले यांनी शहरात सुरू केलेले दालन निश्चितच ग्राहकांना उपयोगी ठरेल असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.
माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले की, आकर्षक कलाकुसर व नाविन्यपूर्ण दागिन्यांचे दालन म्हणून पोपट भगिरथ महाले यांची सर्वदूर ओळख आहे.सराफ व्यवसाय करत असताना ग्राहकांचा विश्वास, सेवा व गुणवता हे तीन सूत्र अंमलात आणून महाले यांनी आपली घौडदौड सुरू ठेवली आहे. देवळाली प्रवरा शहरवासियांसाठी निश्चितच हे दालन पसंतीस उतरेल असे सत्यजित कदम म्हणाले.
यावेळी ओम महाले,ज्योती महाले, योगिता सोनार, रोहिणी महाले, श्रावणी महाले, निधी महाले, किशोर भागवत, निलेश काजळे, राजेश यादव, संजय सोनार, तेजस बेंद्रे, अमोल कुलथे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले तर आभार ओम महाले यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत