हिंदी भाषेच्या विद्यार्थ्याना रोजगाराच्या अनेक संधी- डॉ. दादासाहेब डांगे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

हिंदी भाषेच्या विद्यार्थ्याना रोजगाराच्या अनेक संधी- डॉ. दादासाहेब डांगे

  सात्रळ(वेबटीम) हिंदी भाषा ही फक्त राजभाषा म्हणून राहिली नसून हिंदी वैश्विक भाषा बनली आहे. हिंदी भाषेच्या माध्यमातून अनुवाद, फिल्म उद्योग, ...

 सात्रळ(वेबटीम)




हिंदी भाषा ही फक्त राजभाषा म्हणून राहिली नसून हिंदी वैश्विक भाषा बनली आहे. हिंदी भाषेच्या माध्यमातून अनुवाद, फिल्म उद्योग, पत्रकारिता, पटकथा लेखक, पर्यटन मार्गदर्शक अशा अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, असे मतप्रतिपादन कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, राहाता येथील उपप्राचार्य  डॉ. दादासाहेब डांगे यांनी केले. 


      हिंदी विभागाच्या वतीने आयोजित 'विश्व हिंदी दिवस'  समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात मयुरी सिनारे हिच्या स्वागत गीताने झाली. यावेळी कु. हिना सय्यद, कु. दिव्या मंडलिक, कु. प्रीती शिरसाठ  उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे होते. प्रास्ताविक  हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. भाऊसाहेब नवले यांनी केले तर पाहुण्यांच्या परिचय प्रा. डॉ. अनंत केदारे यांनी केला.

        डॉ.डांगे म्हणाले, आपण राष्ट्रीय हिंदी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो तेवढ्याच उत्साहाने हिंदी भाषेचे प्रचार-प्रसार होण्याच्या दृष्टीने 'विश्व हिंदी दिवस' साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. फक्त इंग्रजी हीच ज्ञानभाषा ही संकल्पना आता कालबाह्य होऊ लागली आहे. कारण हिंदी भाषेच्या माध्यमातून मेडिकल, इंजिनिअरिंग, समाज प्रसार माध्यमे आदी शाखांचे अध्यापनही होऊ लागलेले आहे. यामुळेच जागतिक स्तरावर हिंदी भाषेच्या अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी व इंग्रजीसह विविध भाषांचे ज्ञान मिळविणे काळाची गरज असल्याचे सांगितले. हिंदी किंवा कोणत्याही भाषेचा संबंध फक्त कला शाखेच्या विद्यार्थ्यांशीच असतो, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांगीण विकासासाठी हिंदी भाषेचे ज्ञान महत्वाचे आहे.

        अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे म्हणाले," विविध ज्ञान शाखांच्या विद्यार्थ्यांनी ही हिंदी भाषेचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. विविध भाषी समाजाशी संवाद साधण्यासाठी माध्यम भाषा म्हणून हिंदी भाषेचे ज्ञान ही काळाची गरज बनले आहे. यावेळी प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, डॉ. गंगाराम वडितके यांचेसह विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार कु. हिना सय्यद हीने मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत