राहुरीत भंगार खरेदी दुकानावर पोलिसांच्या धाडी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत भंगार खरेदी दुकानावर पोलिसांच्या धाडी

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यात शेतकरी वर्गाच्या  विद्यूत पंप, केबल साहित्य चोरीला जाण्याच्या घटना वाढत असल्याने पोलीस निरीक्षक मे...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)


राहुरी तालुक्यात शेतकरी वर्गाच्या  विद्यूत पंप, केबल साहित्य चोरीला जाण्याच्या घटना वाढत असल्याने पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी आक्रमक होऊन राहुरी शहर, वांबोरी, देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील  सात भंगार खरेदी करणार्‍या दुकानांवर एकाच वेळी धाड टाकल्या. यावेळी पोलीस निरीक्षक डांगे यांनी  सबळ पुराव्याशिवाय भंगार खरेदी करू नये अशा सूचना दुकानदारांना दिल्या आहेत.






राहुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून  क्षेत्रातून विद्यूत पंप व केबल चोरीला जाण्याचे वाढल्याने बळीराजा हताश झाला आहे. राहुरी पोलिसांत याबाबत अनेक तक्रारी दाखल आहेत.

चोरी गेलेल्या मोटारी, केबल व इतर साहित्य भंगार दुकानांमध्ये विकल्याच्या चर्चा सातत्याने घडत असल्याने पोलीस निरीक्षक डांगे यांनी आज दुपारी वेगवेगळे पथक तयार करून राहुरी फॅक्टरी, राहुरी शहर, वांबोरी, सोनई हद्दीतील भंगार दुकानांमध्ये धाडी टाकल्या. तसेच विद्युत पंप दुरुस्ती दुकानातही पोलिसांनी  विद्यूत पंपाबाबत विचारपूस केली.


पोलिसांच्या पथकाने दुकानदारांची चौकशी करून कागदपत्रांची तपासणी केली. संशयित असणार्‍या खरेदी व विक्रीबाबत पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. काही शेतकर्‍यांना बोलाऊन घेत विद्यूत पंपाबाबत माहिती घेण्यात आली.



या पथकात  पोलिस निरीक्षक डांगे यांनी पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील, चारूदत्त खोंडे यांसह पोलिस हवालदार प्रभाकर शिरसाठ, अशोक शिंदे, सुचिन ताजणे, नदीम शेख, अजिनाथ पाखरे, प्रमोद ढोकणे, शशिकांत वाघमारे आदींचा समावेश होता.



 राहुरी तालुक्यातील भंगार विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांनी अचानक धाडी टाकल्याने त्यांची मात्र चांगली धावपळ उडाली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत