येवला(वेबटीम) संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या धरणग्रस्त सेवा संघ येवला व नाशिक परिसराच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहे. य...
येवला(वेबटीम)
संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या धरणग्रस्त सेवा संघ येवला व नाशिक परिसराच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहे. या भागात सेवा संघाचे कार्य जोमाने वाढविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.
धरणग्रस्त सेवा संघाच्या महाराष्ट्र अध्यक्ष अँड. सिंड्रेला परेरा यांच्या सहीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यावेळी नगर जिल्हाध्यक्ष सागर सावंत, नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश खळे, येवला तालुकाध्यक्ष दामू माळी, जयशी मढवई आदी उपस्थित होते.
नूतन पदाधिकाऱ्यांत येवला तालुका उपाध्यक्षपदी नितीन मढवई यांची निवड करण्यात आली आहे. तसेच
सतीश मुरलीधर पाटील, बाबु गुलाब सोळसे,जयश्री दिपक मढवे,सोनाली आनंद गौड, शोमा केशव पांडे, संगिता अर्जुन मढवई, गायत्री प्रविण महाले,मंगल प्रशांत गायकवाड,मोनाली सुरेंद्र ठाकुर, किशोर चिवडामल भारंबे, शाईन शादिक शेख,संदिप जगन्नाथ उराडे,मंगेश ज्ञानेश्वर काटकर, रविंद्र गंगाधर पोपळघट,संतोष गंगाधर पोपळघट अलका रामश सुर्यवंशी यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.
संपुर्ण महाराष्ट्र भर धरणग्रस्त सेवा संघ भूमिहीन, अल्पभूधारक, गायरान जमीन धारक, गोरगरीब , दिन दुबळ्या व शोषित समाजासाठी काम करत असून येवला तालुक्यातील नवीन पदाधिकारी यांनी तळागाळातील नागरिकांशी संपर्क करून त्यांना या प्रवाहात समविष्ट करावे असे आवाहन महाराष्ट्र अध्यक्षा अँड. सिंड्रेला परेरा यांनी यावेळी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत