राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील केंदळ बुद्रुक येथे कै. सौ. कुंदाताई गोरक्षनाथ डोंगरे यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त डोंगरे परिवार आणि पंचश...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील केंदळ बुद्रुक येथे कै. सौ. कुंदाताई गोरक्षनाथ डोंगरे यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त डोंगरे परिवार आणि पंचशिल फाऊंडेशन, अ.नगर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार २१ जानेवारी रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत मोफत सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात मोफत डोळे तपासणी व डोळ्यांचे ड्रॉप वाटप,बी.पी., शुगर तपासणी,डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, त्वचेचे आजार, पोटाचे विकार, मणक्याचे आजार अशा सर्व आजारांवर मोफत औषधे वाटप तसेच गुडघेदुखी, कंबरदुखी सांधेवात, हात पाय दुखणे, मानदुखी या सर्व आजारांवर आयुर्वेदिक, थेरपी मोफत करण्यात येणार आहे. डोळ्यांसाठी नंबर लागल्यास १००० रु.चा चष्मा फक्त १५० ते २०० रु. मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हाडमोडणे, मुतखडा आणि प्रोस्टेट ऑपरेशन मोफत केले जाणार आहे.
या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन मनोज डोंगरे मित्र परिवार, जय शंभो नारायण मित्र मंडळ तसेच डोंगरे परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत