देवळाली शहराचा कायापालट करणारा स्वच्छता दूत हरपला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली शहराचा कायापालट करणारा स्वच्छता दूत हरपला

  देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथील लिलावती रुग्णाल...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथील लिलावती रुग्णालयात निधन झाले.


  बाळासाहेब चव्हाण यांच्या निधनाने देवळाली प्रवरा शोककळा पसरली असून देवळाली शहराचा कायापालट करणारा स्वच्छता दूत हरपला अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे .


डिसेंबर 2001 ते मार्च 2005 पर्यंत ते देवळाली शहराचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष होते त्याचबरोबर 2011 मध्ये ते डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही कार्यरत राहिले होते त्याचबरोबर जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस आणि विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते देवळाली प्रवरा शहराचे नगराध्यक्ष असताना देवळाली नगरपालिकेला स्वच्छतेचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त करून देण्याचे भाग्य चव्हाण यांना लाभले होते चव्हाण यांच्या काळात देवळाली प्रवरा शहरात ग्राम स्वच्छता अभियान राबवले गेले होते मुस्लिम कब्रस्तानाचा पुनर्वापर हा मोठा निर्णय बाळासाहेब चव्हाण यांनी सर्व मुस्लिम बांधवांना एकत्र घेऊन केला होता त्या निर्णयाची दखल राज्य पातळीवर देश पातळीवर घेण्यात आली होती त्याचबरोबर देवळाली प्रवरा शहरातील रस्ते काँक्रिटीकरण, शिरीष कुमार बालोद्यान, संत तुकाराम महाराज उद्यान,ऐतिहासिक बारव स्वच्छता आदी कामे स्व.बाळासाहेब चव्हाण यांच्या काळात झाली होती.


कॉम्रेड ते काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास झाला.सुंदर आणि आक्रमक वक्ते अशी त्यांची ओळख परिसराला होती त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देवळाली शहरवासीयांनी हळहळ व्यक्त केली,रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार संस्कार करण्यात आले.त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सून नातवंडे असा परिवार आहे.


पाच दिवसांपूर्वी शुभेच्छा अन् आज श्रद्धांजली !

स्व. बाळासाहेब चव्हाण यांचा १ जानेवारी रोजी जन्मदिवस होता. या दिवशी सर्व क्षेत्रातील मान्यवर व शहरवासीयांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आज त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वांना मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर शहरवासीयांनी स्व. चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करून लाडके अण्णा हरपल्याची भावना व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत