नाशिक/(वेबटीम):- घराणेशाही आणि धनदांडगेशाहीला मतदार कंटाळले असून त्यामुळे यावेळी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार र...
नाशिक/(वेबटीम):-
घराणेशाही आणि धनदांडगेशाहीला मतदार कंटाळले असून त्यामुळे यावेळी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रतन कचरू बनसोडे यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे असे उद्गार वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी काढले.
बनसोडे यांच्या प्रचारासाठी नाशकात आले असता नासिक्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बनसोडे यांनी गेल्या सहा महिन्यापासून नाशिक विभागात मतदार नोंदणीचा व प्रचाराचा धडाका लावला आहे.हा मतदारसंघ मोठा असला तरी येथे मोठ्या प्रमाणात नकारात्मकता दिसते.जो उमेदवार निवडून येईल तो कमिटेड मतांच्या जोरावरच असे सांगून आम्ही या मतदारसंघात शर्यतीत आहोत.लोक धनशक्ती आणि घराणेशाहीला यावेळी नाकारतील.आमच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे तालुकास्तरापर्यंत कार्यकर्ते पोहोचले आहेत आणि बनसोडे यांचा जोमाने प्रचार सुरू झाला आहे.कार्यकर्त्यांच्या जोरावरच आम्हाला या मतदारसंघात बनसोडे यांच्याबाबत चांगले चित्र बघायला मिळत आहे,असेही आंबेडकर पुढे म्हणाले.
विधान परिषदेच्या लातूर,अकोला आणि नागपूर येथेही आमच्या उमेदवारांना पोषक वातावरण आहे.कोकणात आम्ही चांगली लढत देणार आहोत.नाशिक पदवीधर मतदार संघात आम्ही तालुकानिहाय अहवाल मागवला असता आम्हाला सर्वत्र चांगले वातावरण असल्याचे चित्र दिसये.या मतदारसंघात शिवसेनेबरोबरच्या युतीबाबत प्रश्न विचारला असता शिवसेनेशी आमचे अजून जमलेले नाही.फक्त एकमेकांवर लाईन मारणे सुरू आहे,असे आंबेडकर यांनी सांगतात पत्रकार परिषदेत हंशा पिकला होता.
नुकत्याच मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी मेट्रोचे उद्घाटन दोन वेळा करणे म्हणजे त्यांची खुर्ची ग्रामपालिका पातळीवर आणण्याचा प्रकार असल्याची टीका आंबेडकर यांनी केली.पंतप्रधान महापालिका स्तरावरील निवडणुकांच्या प्रचाराला येतात याबाबत आपले काय मत आहे असे विचारले असता पंतप्रधानांनी आपली गरिमा राखून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातच प्रचाराला यावे असे आपणास वाटते.मात्र प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असते अशी पुष्टीही त्यांनी जोडली.शासकीय कार्यक्रमांना विरोधी पक्षांच्या लोकांना डावलले जाते याबाबत आंबेडकर यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता पूर्वी शासकीय कार्यक्रम होत त्यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांची नावेही पत्रिकेत असायची.त्यामुळे आता जो पायंडा पाडण्यात येत आहे ही हुकूमशाही आहे का हे लोकांनीच ठरवायचे आहे असा टोलाही त्यांनी लगावला. एकीकडे तुमची शिवसेनेबरोबर युतीची चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटता यामागचे रहस्य काय असा सवाल केला असता इंदु मीलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे स्मारक साकारत आहे त्यात त्यांचा जो भव्य पुतळा बसविण्यात येणार आहे त्यामध्ये कोणताही आक्षेप राहू नये यासाठी मदत करा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी आपणास केल्याने जेव्हा जेव्हा त्याबाबत आपणास बोलावले जाईल तेव्हा तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना भेटत राहीन असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे आधिकुत उमेदवार रतन बनसोडे, राज्याचे नेते शरद खरात,जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, जिल्हा महासचिव अनिल जाधव,जिल्हा उपाध्यक्ष विजय मकासरे, राहुरी तालुकाध्यक्ष संतोष चोळके, पिंटू नाना साळवे,चरणदादा त्रिभुवन,मधुकर साळवे,ब्राम्हणे सर,निलेश जगधने,अजिज भाई व्होरा,संदीप मोकळ, जावेद भाई शेख आदी पदधिकारी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत