'वंचित'ची पाच जिल्ह्यात प्रचारात आघाडी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'वंचित'ची पाच जिल्ह्यात प्रचारात आघाडी

राहूरी/वेबटीम:- नाशिक पदवीधर मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे एबी फार्म असलेले अधिकृत उमेदवार रतन कचरू बनसोडे यांनी नाशिक पदवीधर विभागात अस...

राहूरी/वेबटीम:-

नाशिक पदवीधर मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे एबी फार्म असलेले अधिकृत उमेदवार रतन कचरू बनसोडे यांनी नाशिक पदवीधर विभागात असणाऱ्या पाचही जिल्ह्यामध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पदवीधर मतदार घरघोस मतांनी निवडून देतील, असा संकेत आहेत.

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवारास महाराष्ट्रातील सर्वांचा पाठिंबा मिळाला असल्याच्या वल्गना करीत असले, तरी सेवानिवृत्त उपाआयुक्त रतन बनसोडे हे अनुभवी व उच्च विद्या विभूषित असल्यामुळे सर्वसामान्य जनतेत अल्पावधीत लोकप्रिय ठरत आहेत. 


नाशिक पदवीधर मतदार संघात असलेल्या अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रतन बनसोडे यांचा उत्कृष्ट प्रकारे प्रचार सुरू आहे. त्यांची  प्रचार यंत्रणा अतिशय जोमाने काम करत आहे. यामुळे सर्वसामान्य पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी ठरत आहेत. शिवाय या पाच जिल्ह्यात पदवीधर युवकांच्या व शिक्षकांच्या समस्या जाणून घेत आहे. त्यामुळे उमेदवार रतन बनसोडे पदवीधर मतदारांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.


गेली दोन वर्षांपासून वंचितचे उमेदवार रतन बनसोडे हे नाशिक पदवीधर मतदार संघातील अनेकांशी भेटीगाठी सुरू होत्या. त्यांचा सर्वसामान्य मतदार व नागरीकांशी चांगला जनसंपर्क वाढला आहे. त्यांचा वाढता पाठिंबा पाहता इतर उमेदवारांनी त्यांची धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.


वंचितचे उमेदवार रतन बनसोडे यांचा प्रशासकीय कामकाजातील अनुभव मोठा आहे. त्यामुळे त्यांना पदवीधरांच्या समस्या ज्ञात आहेत. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये पदवीधरांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यापद्धती जिल्हा-जिल्ह्यामध्ये पदवीधर युवकांचे व शिक्षकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासनही प्रचारादरम्यान रतन बनसोडे हे देत आहेत. त्यामुळे येणाऱ्या पदवीधर निवडणुकीमध्ये एक हाती विजय होणार असल्याचेही पदवीधर युवकांमधून बोलले जात आहे.

निवडणुकीत पदवीधरांनी साथ द्यावी : बनसोडे

नाशिक पदवीधर मतदार संघात वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रणांगणात उभा आहे. त्यामुळे  नाशिक पदवीधर मतदार संघात असलेल्या अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यातील पदवीधर तरुणांनी निवडणूकीत साथ द्यावी, अशी प्रतिक्रिया उमेदवार रतन बनसोडे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत