राहूरीतील ' या' भूमिपुत्राची रायगडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरीतील ' या' भूमिपुत्राची रायगडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

  राहुरी(वेबटीम) गेल्या तीन  आठवड्यांपासून रिक्त असलेल्या रायगडच्या जिल्हाधिकारीपदी राज्य सरकारने डॉ. योगेश म्हसे यांची सोमवारी नियुक्ती केल...

 राहुरी(वेबटीम)



गेल्या तीन  आठवड्यांपासून रिक्त असलेल्या रायगडच्या जिल्हाधिकारीपदी राज्य सरकारने डॉ. योगेश म्हसे यांची सोमवारी नियुक्ती केली. सोमवारी सायंकाळी त्यांनी कोकण भवनात विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्याकडून पदभार स्वीकारला.


 म्हसे यापूर्वी म्हाडाच्या मुंबई विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. वरळी व नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या योजनेत त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.


डॉ. योगेश म्हसे हे मूळचे राहुरी तालुक्यातील कोंढवड य (जि. अहमदनगर) येथील भूमिपुत्र असून पशूवैद्यकीय अधिकारी म्हणून पदवी घेतल्यानंतर त्यांनी एमपीएससीच्या माध्यमातून शासकीय सेवेत प्रवेश केला. २००९ साली त्यांना आयएएस म्हणून बढती मिळाली. त्यांनी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक, भिवंडी महापालिकेचे आयुक्त तसेच सिडको, पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. दिवंगत नेते व माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे स्वीय सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.


त्यांच्या या निवडीबद्दल राहुरी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मंडळींकडून आनंद व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत