मंगेश कडलग यांना 'रयत' चा 'कार्यक्षम गुरुकुल प्रकल्प प्रमुख' पुरस्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मंगेश कडलग यांना 'रयत' चा 'कार्यक्षम गुरुकुल प्रकल्प प्रमुख' पुरस्कार

सात्रळ(वेबटीम) रयत शिक्षण संस्थेच्या सात्रळ ता-राहुरी येथील श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयातील उपशिक्षक मंगेश गुलाबराव ...

सात्रळ(वेबटीम)



रयत शिक्षण संस्थेच्या सात्रळ ता-राहुरी येथील श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयातील उपशिक्षक मंगेश गुलाबराव कडलग यांना रयत शिक्षण संस्था, कर्मवीर विद्याप्रबोधिनी यांचे मार्फत दिला जाणारा 2019-20 साठीचा ' भास्करराव गलांडे कार्यक्षम गुरुकुल प्रकल्प प्रमुख पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राजेंद्रजी फाळके यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.



यावेळी व्यासपीठावर रयतेचे व्हाईस चेअरमन  भागीरथजी शिंदे, रयत च्या उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आशुतोषजी काळे, रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, बाळासाहेब बोठे ,विभागीय अधिकारी तुकाराम  कन्हेरकर,सहाय्यक विभागीय अधिकारी काकासाहेब वाळुंजकर , शिवाजी तापकीर , ज्ञानदेव पांडुळे आदी उपस्थित होते.


दरवर्षी रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांना हे पुरस्कार दिले जातात.


मंगेश कडलग हे मूळचे    जवळे कडलग ता. संगमनेर येथील मूळ रहिवासी असून सध्या ते रयत च्या सात्रळ येथील कडू पाटील रयत संकुलात कार्यरत आहेत.               


  मंगेश कडलग यांना शैक्षणिक क्षेत्रातील कामासाठी यापूर्वी गुणवंत शिक्षक पुरस्कार तसेच संकेत व लोकरंग प्रतिष्ठान चा आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच राज्यपातळीवरील शरद पवार इंस्पायर फेलोशिपसाठी देखील मंगेश कडलग पात्र ठरले आहेत. 


मंगेश कडलग यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू , मुख्याध्यापिका.सौ. अनिता निबे,प्राचार्य  ससाणे सर,स्थानिक स्कुल कमिटी सदस्य विजयराव कडू , भास्कराव फणसे,संभाजीराव चोरमुंगे,शांतीभाऊ गांधी,बबनराव कडू पाटील, किरण कडू पाटील, गणेश कडू पाटील,पंकज कडू पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत