राहुरी/वेबटीम:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात चौकशी न करता केलेला खोटा...
राहुरी/वेबटीम:-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात चौकशी न करता केलेला खोटा विनयभंगाचा गुन्हा तातडीने मागे घेऊन योग्य न्याय निवाडा करावा अन्यथा राहुरी पोलीस ठाण्यासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा आरपीआयचे तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्यावर शनिवार दि. १४ जानेवारी २०२३ रोजी कुठल्याही प्रकारची शहानिशा करता जो गुन्हा दाखल केला तो चुकीचा आहे.
वास्तविक पाहता गुन्हा घटना व तारीख ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. मल्हारवाडी रोड, ता. राहुरी घरासमोरील असतांना व दि. १३ डिसेंबर २०२२ रोजी सायं. ४.४५ वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालय, अहमदनगर या ठिकाणी झाल्याचे फिर्यादिने म्हटले आहे. वास्तविक फिर्यादीने फिर्याद दाखल करण्यास विलंब का केला याची शहानिशा न करता फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे खोटी फिर्याद नोंदवून घेतली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाध्यक्ष पगारे यांना जाणीवपूर्वक खोटया गुन्हयामध्ये अडकविण्याचे षडयंत्र आहे. कारण फिर्यादीचे बहिणीचे पती यांचा अपघात झाला असता त्यावेळी व्यक्तीशः जिल्हाध्यक्ष पगारे यांनी मदत केली असल्याने तसेच फिर्यादीचे तिच्या बहिणी सोबत प्रॉपर्टी संदर्भात वाद असल्याने जिल्हाध्यक्ष पगारे वेळोवेळी त्यांना मदत करत असतात.
या कारणामुळे फिर्यादी हिने यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी खोटया आशयाची फिर्याद दाखल केलेली आहे.
या घटनेची कायदेशीररित्या संपूर्ण चौकशी व शहानिशा होऊन घटनेचा पूर्ण तपास करून न्यायनिवाडा करावा व जिल्हाध्यक्ष पगारे यांच्यावर चुकीची कारवाई करू नये. चुकीची कारवाई झाल्यास आरपीआयच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्यासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आलेला आहे.
या निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रदिप मकासरे, जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे, सचिन ब्राह्मणे, प्रतीक खरात, प्रतीक रुपटक्के, दिनेश पलघडमल,रमेश पलघडमल आदींच्या सह्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत