कोपरगाव (वेबटीम) कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील माजी सैनिक कोपरगाव तालुका एक्स सर्विसमेंस असोसिएशनचे संस्थापक सुभेदार शांतीलाल भास्करर...
कोपरगाव (वेबटीम)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील माजी सैनिक कोपरगाव तालुका एक्स सर्विसमेंस असोसिएशनचे संस्थापक
सुभेदार शांतीलाल भास्करराव होन यांची भारतीय मीडिया फेडरेशन नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य सैनिक फोरम कमिटीच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
भारतीय स्वातंत्र्यचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भारतीय लष्कर दिनाच्या दिवशीच
त्यांच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीचे नाव पुढे आले होते.महाराष्ट्र राज्य सेंटर सैनिकी फेडरेशनवर त्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती.
त्यांनी केलेल्या माजी सैनिकांच्या विविध प्रकारच्या कामाबाबत फेडरेशनने माहिती काढत सैनिकी क्षेत्रात केलेल्या अतुलनीय व अभूतपूर्व कामगिरीबद्दल त्यांची भारतीय मीडिया फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य सैनिक फोरम कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड केली.
राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वाघ, एम ए अन्सारी, केंद्रीय सुप्रीम कमिटीचे अध्यक्ष करण छौकर,राष्ट्रीय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कुमार मौर्या यांच्या स्वाक्षरी असलेले निवड पत्र सुभेदार होन यांना प्राप्त झाले आहे
कोपरगाव तालुका एक्स सर्विसमेंस अससोसिएशनची स्थापना करून कोपरगाव तालुक्यात व अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी माजी सैनिकांसमोर असलेल्या समस्या व इतर प्रश्र्न शासकीय पातळीवर हाताळले. माजी सैनिकांच्या वीर पत्नीनाही संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणले.कायम संघटनेसाठी ते झगडत असतात त्यामुळेच त्यांची ही निवड झाली आहे.
माजी सैनिकांच्या विविध समस्या, मागण्या तसेच वीर पत्नींच्याही समस्या निष्पक्षपणे मीडियासमोर मांडण्याचे काम त्यांच्याकडे आले आहे.
सैनिक फोरम मिडीया कमिटीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सुभेदार शांतीलाल होन यांचे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज,महाराष्ट्र सैनिक आघाडीचे अध्यक्ष उद्योगपती नारायण अंकुशे, माजी सभापती अनुसयाताई होन, रोहिदास होन, चांदेकसारे सोसायटीचे अध्यक्ष सुभाष होन, प्राध्यापक विठ्ठल होन अदीसह चांदेकसारे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत