राहुरी(प्रतिनिधी) नाशिक पदवीधर मतदारसंघात येणाऱ्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावात वंचितचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि त्या...
राहुरी(प्रतिनिधी)
नाशिक पदवीधर मतदारसंघात येणाऱ्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावात वंचितचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि त्यातून निर्माण झालेले पारिवारिक नाते हा माझ्यासाठी मोठा अनमोल ठेवा आहे. त्यांचाच आदर्श घेऊन आपण जुन्या पेन्शन सह शिक्षण विभागासह विविध क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करणार असून सर्वांना मोफत शिक्षण व चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रतन बनसोडे यांनी केले ते राहुत पञकारांशी संवाद साधताना बोलत होते.
हे सरकार पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहे. विद्यमान आमदारांनी देखील पदवीधर पदवीधरांच्या प्रश्नांसंदर्भात दुर्लक्ष केले आहे. हे नेमके कोणत्या पक्षात हेच सध्या मतदारांना समजण्यासे झाले आहे. स्वतः च्या फायद्याकरीता हे कुठल्याही थराला जातात ते लोकांचे काय भले करतील असा सवाल बनसोडे यांनी उपस्थित केला.ते म्हणाले की, आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हि निवडनुक लढवत आहोत. मी स्वतः एका चांगल्या विभागात अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे.त्यामुळे पदवीधरांच्या समस्या काय असतात याची मला चांगली जाणीव आहे. आपण येत्या काळात पदवीधरांच्या समस्या सोडविण्याठी प्रयत्न करणार आहोत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत