सात्रळ(वेबटीम) महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय भानसहिवरे या महाविद्यालयातील कृषि कन्या यांनी ग्रामीण भागातील शेतीविष...
सात्रळ(वेबटीम)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय भानसहिवरे या महाविद्यालयातील कृषि कन्या यांनी ग्रामीण भागातील शेतीविषयक माहिती व अभ्यास, मार्गदर्शन करण्यासाठी धानोरे (ता. राहुरी) या गावाची निवड केली आहे या कृषी कन्यांचे धानोरे गावात आगमन झाले आहे.
अडीच महिन्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या कृषी कन्या कु. मेघा साळवे ,कु. साक्षी मखरे,कु. लतिका कोकणी, कु. स्नेहा ठाकरे यांनी सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली . यावेळी सरपंच श्री शामू माळी व इतर सदस्य यांनी कृषि कन्या यांचे स्वागत केले.
अभ्यास दौऱ्यादरम्यान कृषी कन्या धानोरेसह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिक लागवड , संगोपन, खते व पाणी नियोजन, उत्पादन व शेतमालाला मिळणारा बाजारभाव, जैविक खत माहिती,फळबाग माहिती इ. याविषयी मार्गदर्शन तसेच माहिती संकलित करणार आहेत . सदर प्रकल्पासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. अतुल दरंदले , कार्यक्रम समन्वयक एम आर माने, अधिकारी एस एस साबळे, पी जे कर्पे, प्रा. एस डी सोंजे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत