राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील हॉटेल प्रसादच्या लगत नाश्ता सेंटरच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू ...
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील हॉटेल प्रसादच्या लगत नाश्ता सेंटरच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर राहुरी पोलिसांनी छापा टाकून एकाविरुध्द गुन्हा दाखल करून दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.
नगर ते मनमाड मार्गावरील कोल्हार खुर्द गावचे शिवारातील हॉटेल न्यू प्रसाद लगत असलेल्या अपना नाष्टा सेन्टर पत्राचे शेड पाठीमागे असणारे पत्राचे खोल्यामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांना मिळाली त्यानुसार आज पहाटे छापा टाकुन एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली असुन त्यामधील एक पिडीत महिला परराज्यातील आहे. या कारवाईत२०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.
आरोपी वसंत रघुनाथ लोंढे रा. कोल्हार खुर्द यास ताब्यात घेवुन राहुरी पोलीस स्टेशन येथे मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा १९५९ चे कलम ३,४,५,७,८ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.मेघशाम डांगे, पोसई निरज बोकील, पोना विकास शिवाजी साळवे, पो. कॉ. सचिन विठठल ताजने, पो. कॉ. नदिम जाफर मोहम्मद शेख, मंजुश्री सुभाष गुंजाळ, जालींदर अबाजी साखरे, पोकोबरोहित पालवे , पो. कॉ. आजिनाथ महादेव पाखरे आदींनी ही कारवाई केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत