श्रीरामपुरातील 'त्या' चर्चमधील बेकायदेशीर हस्तक्षेपाविषयी पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपुरातील 'त्या' चर्चमधील बेकायदेशीर हस्तक्षेपाविषयी पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई

  श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर येथील फेथ ए. जी चर्च येथे अनधिकृत  लोकांचे अतिक्रमण आणि बेकायदेशीर हस्तक्षेपाविषयी वारंवार पोलीस प्रशासनाला ...

 श्रीरामपूर(वेबटीम)



श्रीरामपूर येथील फेथ ए. जी चर्च येथे अनधिकृत  लोकांचे अतिक्रमण आणि बेकायदेशीर हस्तक्षेपाविषयी वारंवार पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन अद्याप कुठलीही कार्यवाही न झाल्याने राहुरी तालुका आरपीआय आंबेडकर पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांच्या नेतृत्वाखाली  श्रीरामपूर  शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना निवेदन देण्यात आले.


या निवेदनात म्हंटले की, श्रीरामपूर येथील फेथ ए. जी. चर्चमधील अनाधिकृत लोकांचे अतिक्रमण आणि बेकायदेशीर हस्तक्षेपाविषयी दाखल प्रकरणाबाबत वारंवार वैयक्तिक भेटून आणि लेखी तक्रारी देऊनही हेतुपुरस्सरपणे ह्याप्रकरणाबाबत दिरंगाई होत असून  चर्च मध्ये भाविक स्त्रिया आणि पुरुष आणि इतर जनतेचे घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होत असून पोलीस प्रशासन कोणताही हस्तक्षेप करीत नाही.


 या चर्चमध्ये अनाधिकृत लोक येऊन स्थानिक भाविक आणि चर्च सभासद आणि स्थानिक पाळकाला गुंडागर्दी करणे, दमदाटी करणे, चर्चला कुलूप लावने, स्त्रियांच्या अंगावर धावून जाणे, लजास्पद वर्तन करणे, चर्चमध्ये उपासना करून न देणे, स्थानिक पाळक सचिन चक्रनारायण यांना त्यांच्या लहान मुलांसह त्यांचे स्थानिक निवासी घर खाली करण्यास जबरदस्ती करणे, स्थानिक चर्च मधील भाविकांना चर्च चालू असताना मध्येच अडथळा निर्माण करणे आणि त्यांच्या अनाधिकृत संस्थेचे सभासद फॉर्म्स भरून सभासद बनण्यास भाग पडणे इत्यादी घडत आहे.

पोलिसांना वारंवार निवेदन देऊन कुठलीही कार्यवाही झाली नाही.


शनिवार दिनांक ७ जानेवारी २०२३ पर्यंत न झाल्यास रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए) अध्यक्ष  दिपकभाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा अध्यक्ष राकेश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला.


यावेळी आरपीआय आंबेडकर पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांच्यासह  जिल्हा अध्यक्ष राकेश कापसे, युवक जिल्हा अध्यक्ष रॉकी लोंढे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष श्रीकांत म्हकाळे, श्रीरामपूर शहर अध्यक्ष शुभम शेळके, धर्मगुरू सचिन चक्रनारायण, विलास शेळके, राहुल भोसले, शंकर शेळके,सचिन ब्राम्हणे ,चर्चच्या महिला पालक सोनाली चक्रनारायण-देठे ,जयंती साळवे  मंगल मनतोडे आदिंसह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत