राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा व सोनगाव येथील प्रवरा परिसरात गावठी दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकले ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा व सोनगाव येथील प्रवरा परिसरात गावठी दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर चे निरीक्षक श्री गोपाळ चांदेकर यांनी दिली.
आज देवळाली प्रवरा व सोनगाव या कारवाईत एकूण ०७ गुन्हे नोंद करण्यात आले असून १८६० ली. कच्चे रसायन व ७० ली हातभट्टी गावठी दारू व हातभट्टी गावठी दारू निर्मितीचे लोखंडी व प्लॅस्टिक बॅरल व इतर साहीत्य नष्ट करण्यात आले आहे. सदर मुद्देमालाची एकूण किंमत रु.५५०४०/- इतकी आहे सदर कारवाईत इंदू सर्जेराव माळी (,देवळाली प्रवरा)व संदीप मधुकर पगारे (सोनगाव) यांच्यावर मुंबई दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हे नोंद कारण्यात आले आहेत.
अनिल चासकर विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग पुणे, श्री. गणेश पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर श्री नितेश शेंडे उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री अनिल पाटील निरीक्षक, श्री संजय कोल्हे निरीक्षक कोपरगाव विभाग, श्री गोपाल चांदेकर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २. श्रीरामपूर, श्री बाळासाहेब हुलगे निरीक्षक श्रीरामपूर विभाग यांचे सह भरारी पथक क्र. २. श्रीरामपूर विभाग, कोपरगाव विभाग, श्रीरामपूर विभाग व संगमनेर विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्त पणे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत