पानेगांव (वेबटीम)- नेवासे तालुक्यातील श्री क्षेत्र वाटापूर येथे तीन दिवसीय नवनाथ पारायण सोहळा व धर्मनाथ बीज सोहळा उत्साहात पार पडला आहे. श्र...
पानेगांव (वेबटीम)-
नेवासे तालुक्यातील श्री क्षेत्र वाटापूर येथे तीन दिवसीय नवनाथ पारायण सोहळा व धर्मनाथ बीज सोहळा उत्साहात पार पडला आहे. श्री क्षेत्र वाटापूर या ठिकाणी ह.भ.प.महंत भास्करगिरीजी महाराज, ह.भ.प.महंत अरुणगिरीजी महाराज, ह.भ.प.सुनिलगिरीजी महाराज, ह.भ.प.रमेशानंदगिरीजी महाराज यांचे कृपाशीर्वादाने तीन दिवसीय नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठ चालक ह.भ.प.विठ्ठल महाराज जाधव (शिरेगाव), ह.भ.प.भाऊराव महाराज काटे (तमासवाडी), ह.भ.प.सिताराम महाराज औटी होते. सोमवार सकाळी ह.भ.प.रामायाणाचार्य प्रभाकर महाराज कावले (कारेगाव) यांचे काल्याचे किर्तन झाले. ह.भ.प कावले महाराज यांनी आपल्या अमृतवाणीतून नवनाथ ग्रंथावर सविस्तर असे वर्णन करून भगवान श्रीकृष्ण यावरही कीर्तनात महती सांगितली.
वाटापूर हे गाव कौतुकी नदीच्या तीरावर असून या ठिकाणी रेवणनाथाची समाधी आहे. या समाधी मंदिराचे बांधकाम ह.भ.प भास्करगिरीजी महाराज, ह.भ.प सुनिलगिरीजी महाराज यांच्या अधिपत्याखाली व माजी मंत्री आमदार शंकरराव पाटील गडाख व जि.प.अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती श्री सुनिलभाऊ गडाख यांचे मदतीने दिड कोटी रुपयाचे बांधकाम सद्या प्रगतीपथावर आहे. मंदिराच्या बांधकामासाठी परिसरातील व महाराष्ट्रातील नाथ भक्तांनी सढळ हाताने मदल केली आहे. धर्मनाथ बीज उत्सवास ह.भ.प सुनिलगिरीजी महाराज व ह.भ.प प्रकाशानंदगिरीजी महाराज, मुळाचे संचालक संजय पाटील जंगले, उद्योगपती दत्तात्रय पाटील घोलप, शिरेगावचे माजी सरपंच किरण जाधव, ह.भ.प.ज्ञानदेव ,लाटे, ह.भ.प.कारभारी महाराज सुकाळकर, तसेच विविध गावचे सरपंच,उपसरपंच, चेअरमन या वेळी उपस्थित होते. काल्याच्या कीर्तनास परिसरातील ४००० ते ५००० भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्री सिध्द रेवणनाथ मित्र मंडळ व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ असे नियोजन केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत