राहुरी/वेबटीम:- पदवीधर तरुणांची या सरकारने क्रूर चेष्टा केली आहे. विद्यमान आमदारांनी देखील पदवीधरांच्या अनेक प्रश्नांकडे सपशेल दुर्लक्ष ...
राहुरी/वेबटीम:-
पदवीधर तरुणांची या सरकारने क्रूर चेष्टा केली आहे. विद्यमान आमदारांनी देखील पदवीधरांच्या अनेक प्रश्नांकडे सपशेल दुर्लक्ष केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रतन बनसोडे यांनी दिला आहे.ते राहुरीत बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीचे नाशिक पदवीधर मतदार संघाचे उमेदवार रतन बनसोडे यांचा काल राहुरी झंझावत दौरा पार पडला. राहुरी तहसील कार्यालय, राहुरी न्यायालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, गाडगे महाराज आश्रम शाळा आदि ठिकाणी जात मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या.तसेच नेवासा,श्रीरामपूर, लोणी, संगमनेर आदि तालुक्यांमधे हा दौरा पार पडला. त्यांच्यासमवेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, जिल्हा महासचिव अनिलर जाधव, राहुरी तालुक्याचे कायदेशीर सल्लागार तालुका कार्याध्यक्ष एॅड. भाऊसाहेब पवार, राहुरी शहराध्यक्ष पिंटूनाना साळवे, जिल्हा संघटक निलेश जगधने, जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह गायकवाड आदि होते. प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे म्हणाले की, पदवीधरांचा आमदार म्हणणा-यांनी पदवीधरांसाठी कुठलेही ठोस कार्य केलेले नाहीत. पदवीधारकांना साधा सन्मानजनक बेरोजगार भत्ता देखील हे देऊ शकले नाही. 2020 साली प्रति महिना पाच हजार रुपये रोजगार भत्ता देण्याची घोषणा करणारे नेत्यांनी पदवीधरांची दिशाभूल केली.त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व पदवीधरांच्या वास्तविक समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत. सध्या कोणता पक्षात कोणता नेता आहे हेच नाशिक पदवीधर मतदार संघात समजेनासे झाले त्यामुळे वंचितच्या निष्ठावान उमेदवारांना यावेळी मतदार विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत