डॉ विजय मकासरे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द, उच्च न्यायालयाचा आदेश.. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डॉ विजय मकासरे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द, उच्च न्यायालयाचा आदेश..

  राहुरी(वेबटीम) राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांच्या विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीसांनी दाखल केलेला खोटा गुन्हा उच्च न्याय...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांच्या विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीसांनी दाखल केलेला खोटा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला असल्याचे औरंगाबाद उच्च न्यायालयातील विधिज्ञ डि. आर.मरकड यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.


प्रसिद्धी पत्रात म्हंटले की, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मधील एका जुन्या गुन्हयातून डॉ. विजय मकासरे यांचे नांव वगळण्यासाठी पोलीस स्टेशन मधील पोलीसांनी लाचेची मागणी केल्यामुळे डॉ. विजय मकासरे यांनी सदर पोलीसांविरुध्द लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्याची पडताळणी करणेकामी लाच लुचपतच्या अधिका- यांनी सापळा रचून पंचासह डॉ. मकासरे यांना त्यांच्या फॉरच्युनर गाडीमध्ये पोलीस स्टेशन समोर पाठविले होते परंतु लावलेला सापळा अयशस्वी झाल्यामुळे डॉ. मकासरे व पंच हे ठरलेल्या ठिकाणी निघाले होते परंतु सापळा लावल्याचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी रिचर्ड गायकवाड या पोलीस कर्मचान्याला पाठवून डॉ. मकासरे यांची गाडी पोलीस स्टेशनला घेऊन येण्याचे सांगितले.



तथापि डॉ. मकासरे हे त्यांची गाडी घेऊन जात असतांना पो. नि. श्रीहरी बहिरट यांच्या सांगण्यावरून पो. कॉ. रिचर्ड गायकवाड हे जबरदस्तीने गाडीत बसून गाडी पोलीस स्टेशन मध्ये घेण्यासाठी जबरदस्ती करत होते. परंतु डॉ. मकासरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका- यांच्या सांगण्यावरुन त्यांची गाडी बेलापूर रोडनी नेली. हे सर्व रिचर्ड गायकवाड यांनी पो. नि. श्रीहरी बहिरट यांना फोन करून बेलापूर रोडला येण्यास सांगितले. म्हणून पो. नि. श्रीहरी बहिरट व पोलीस कर्मचारी किशोर जाधव यांनी खाजगी गाडीने डॉ. विजय मकासरे यांच्या गाडीचा पाठलाग करुन डॉ. मकासरे यांच्या गाडीला गाडी आडवी लावली व डॉ. मकासरे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याच्या उद्देशाने धावून आले हे चालू असतांनाच लाचलुचपत विभागाचे अधिकारी त्याठिकाणी आले व त्यांनी डॉ. विजय मकासरे यांची सुटका केली व लाचलुचपतच्या अधिका-यांनी त्यांची ओळख पो. नि. श्रीहरी बहिरट यांना करुन दिली व हा सर्व प्रकार आमच्या सांगण्यावरून झाला आहे. तरी डॉ. विजय मकासरे यांच्यावर गुन्हा दाखल करू नका असे सांगितले. तरी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट संगनमताने रिचर्ड गायकवाड याला फिर्याद दयायला सांगून डॉ. विजय मकासरे यांचे विरोधात सरकारी कामात अडथळा (कलम ३५३,३३२,३६८, २८३, १८८) इत्यादी कलमान्वये, दि. १०/०७/२०१९ रोजी गुन्हा दाखल करून चुकीच्या पध्दतीने तपास करून घाईघाईने दोषारोप पत्र दाखल केले होते या विरोधात डॉ. विजय मकासरे यांनी अॅड. दत्तात्रय मरकड यांच्या मार्फत उच्च न्यायालयात दोषारोप पत्र रदद् होणेकामी याचिका दाखल केली होती. सदर प्रकरणामध्ये  उच्च न्यायालयाने डॉ. विजय मकासरे यांच्या गाडीमध्ये असलेली सी. सी. टिव्ही फुटेज व लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईची कागदपत्रे पाहून तत्कालीन पो. नि. श्रीहरी बहिरट यांनी सदरच्या गुन्हयाचा चुकीचा पध्दतीने तपास करून केवळ त्यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाची केस दाखल होऊ नये म्हणून डॉ. विजय मकासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे मत नोंदवून डॉ. विजय मकासरे यांच्या विरुध्दचा गुन्हा रदद् केला आहे.



त्यामुळे डॉ. विजय मकासरे हे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व इतर कर्मचारी यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला म्हणून अब्रू नुकसानीचा मानहानीचा दावा दाखल करणार असून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अँड.मरकड यांनी प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत