गुहात कानिफनाथांच्या आरतीवरून तणाव, गावात मोठा पोलीस फौजफाटा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुहात कानिफनाथांच्या आरतीवरून तणाव, गावात मोठा पोलीस फौजफाटा

राहुरी/वेबटीम:- शनिवार दि.२१ रोजी गुहा ता.राहुरी येथे अमवस्या असल्याकारणाने मढी येथे जाता गुहा येथेच कानिफनाथ महाराज यांच्या मंदिरात आरती कर...

राहुरी/वेबटीम:-

शनिवार दि.२१ रोजी गुहा ता.राहुरी येथे अमवस्या असल्याकारणाने मढी येथे जाता गुहा येथेच कानिफनाथ महाराज यांच्या मंदिरात आरती करून महाप्रसादाचा कार्यक्रम ग्रामस्थांनी आयोजित केला होता.परंतु गावातीलच एका गटाने होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध दर्शविला.

एका गटाने होणाऱ्या कार्यक्रमास विरोध दर्शविल्यामुळे गुहा गावासह वाड्यावस्तीवर कानिफनाथ महाराज यांच्या आरतीला विरोध झाल्याची बातमी सर्वत्र पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हनुमान मंदिराच्या परिसरात ग्रामस्थ एकत्र येत आरती करणारच या भूमिकेवर ठाम राहिले.

पोलिस निरीक्षक डांगे यांनी पोलिस बंदोबस्त देवून गुहा गावाचे वातावरण शांत ठेवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.

आरती करण्याच्या भूमिकेवर एका गटाने शांततेत भूमिका घेतली असतांना दुसऱ्या गटाने आक्रमक होत विशिष्ट प्रकारच्या घोषणा देत वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला.तसेच महिलांना पुढे घालत आरती नंतर वाटण्यासाठी आणलेला प्रसाद मंदिरा पर्यंत आणण्यास मज्जाव केला.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळला.

या प्रसंगी  किरण कोळसे, देवेंद्र लांबे, मच्छिंद्र कोळसे,अनिल सौदागर,नंदू सौदागर,ऋषिकेश बांगरे,शशिकांत कोळसे,मच्छिंद्र शिंदे,अशोक उऱ्हे,रामनाथ उऱ्हे,गंगाराम चंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी अँड.सचिन कोळसे,अँड.प्रसाद कोळसे,राजेंद्र कोळसे,अशोक लांबे,सुजित वाबळे,अविनाश ओहळ,पोपट डौले,दिपक सौदागर,शाम सौदागर,राम बर्डे,रविंद्र उऱ्हे,बाबासाहेब मांजरे,सोमनाथ कोळसे,शिवाजी सौदागर आदी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत