राहुरी(प्रतिनिधी) ग्रामीण भागातील मुलांची गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास निश्चित चांगल्या पदावर संधी मिळते असे प्रतिपादन मा...
राहुरी(प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील मुलांची गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास निश्चित चांगल्या पदावर संधी मिळते असे प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले
गुहा येथील सुमित भाऊसाहेब उ-हे यांनी शेती भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या शेती संशोधन परीक्षेत उत्तीर्ण होऊन किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार येथे कृषी शास्त्रज्ञ पदावर नियुक्ती झाल्याबद्दल प्रेरणा पतसंस्थेत सन्मान करण्यात आला.प्रसंगी श्री.तनपुरे बोलत होते. यावेळी प्रेरणा उद्योग समुहाचे संस्थापक सुरेश वाबळे उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी खा.तनपुरे म्हणाले की, आज काल ग्रामीण भागातील मुले अतिशय मेहनत घेऊन उच्च पदापर्यंत पोहचत आहे ही आनंदाची बाब आहे.
प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले की, गुहा गावातील अनेकांना उच्च पदावर काम करण्याची संधी मिळत असल्याने सर्वांना अभिमान आहे. ग्रामीण भागातील मुलांनी स्पर्धा परिक्षांची तयारी करावी या हेतूने गावात स्पर्धा परीक्षा केंद्र सूरु करणार असल्याचे सांगितले.
यावेळी सुरेश निमसे, आबासाहेब वाळूंज, प्रेरणा पतसंससंस्थेचे .व्हा.चेअरमन मच्छिंद्र हुरूळे , मल्टीस्टेटचे व्हा.चेअरमन विष्णुपंत वर्पे, प्रेरणा सोसायटी व्हा. चेअरमन अशोक उर्हे, संचालक प्रा. वेणुनाथ लांबे, अविनाश ओहोळ संचालक अशोक शिंदे, सुजित वाबळे ,गंगाराम चंद्रे, सुखदेव कोळसे, उपसंरपच रवींद्र उर्हे, रामा बर्डे, शंकर सौदागर, डॉ वाबळे, प्रकाश शिंदे, शरद वाबळे, प्रकाश शिंदे, लालजी आंबेकर, काकासाहेब चंद्रे ,भाऊसाहेब चंद्रे, विजय चंद्रे, सिद्धार्थ वाबळे राजेंद्र गांडूळे,शिवाजी भाऊ उर्हे , अनिल आंबेकर, रविंद्र डौले सादीक सय्यद ,अनिल वर्पे, भाऊसाहेब कोळसे , संजय शिंदे, निलेश ओहोळ, बाबासाहेब उर्हे, सिताराम चंद्रे, पांडुरंग उर्हे, प्रेरणा परिवारातील अधिकारी व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
*शेतकऱ्याचा मुलगा कृषी शास्त्रज्ञ*
गुहा गावातील शेतकरी भाऊसाहेब उ-हे यांचा मुलगा सुमीत यांनी अतिशय मेहनत घेऊन कृषी शास्त्रज्ञ पदापर्यंत पोहचल्याने गुहा गावकऱ्यांसाठी व शेतकरी वर्गासाठी सर्वाधिक आनंदाची बाब आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत