पोहेगाव(वेबटीम) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील अश्वप्रेमी सुनील गोविंद गुडघे यांच्या 36 महिन्याच्या घोड्याचे काल गॅस्ट्रो आजाराने निधन झ...
पोहेगाव(वेबटीम)
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील अश्वप्रेमी सुनील गोविंद गुडघे यांच्या 36 महिन्याच्या घोड्याचे काल गॅस्ट्रो आजाराने निधन झाले. नगर नाशिक औरंगाबाद आधी जिल्ह्यात शर्यतीच्या मैदानावर एकदाही हार या घोड्याने पत्करली नव्हती. अनेक शर्यती जिंकत त्याने आपले चाहता वर्ग कामवला होता परंतु मंगळवारी रात्री अचानक झालेल्या गॅस्ट्रो आजाराने या आश्वाचे दुःखद निधन झाले.रातोरात शंभूच्या निधनाची बातमी पसरतात सोनेवाडी ग्रामस्थांसह परिसरातील अश्वप्रेमी शोकसागरात बुडाल्याची दिसून आले.
बुधवारी सकाळी दहा वाजता शंभूच्या अंत्य दर्शनानंतर सुनील गुडघे यांच्या शेतातच शंभुला समाधिस्त करण्यात आले.दोन दिवसांपूर्वीच शर्यतीचे मैदान गाजून आल्यानंतर पुन्हा गुरुवारी शेतीला जाण्यासाठी शंभू व टीमची तयारी सुरू झाली होती मात्र मंगळवारी रात्रीच शंभूला अस्वस्थ वाटू लागल्याने सुनील गुडघे ,सौ अनिता गुडघे मुलगा राहुल गुडघे व चिंतातूर झाला. शंभू आजारी असल्याने त्यांनी रात्रीचे जेवणही घेतले नाही ताबडतोब पशुवैद्यकीय डॉ चव्हाण व डॉ घायतोडे यांना शंभुवर उपचार करण्यासाठी बोलावले. डॉक्टरासह गुडघे परिवार रात्रभर शंभूला बरं वाटावे म्हणून प्रार्थना करत होता. मात्र अति तीव्र गॅस्ट्रो झाल्याने उपचारादरम्यानच शंभूचा अंत झाला.गुडघे कुटुंबाने मुलाप्रमाणेच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला शंभू आपल्यातून गेल्याने टाहो फोडला.वाऱ्यासारखी बातमी गावात पसरतात हजारो ग्रामस्थ व वैजापूर, संगमनेर, नाशिक, मालेगाव, नगर , कोपरगाव येथील अश्वप्रेमी शंभूच्या अखेरच्या दर्शनासाठी आले.
आपल्या 36 महिन्याच्या आयुष्यात शंभुने अनेक पराक्रम करत वेगवेगळ्या ठिकाणी शर्यती जिंकल्या होत्या. पुणे येथील शर्यत जिंकल्यानंतर शंभूला 11 लाख रुपयांची मागणी झाली होती मात्र सुनील गुडघे यांनी शंभू आपल्या घरातील एक सदस्य असल्याने शंभूची विक्री होणार नाही असे सांगितले. त्यामुळे शंभू आणखीनच हवाहवासा वाटू लागला.मात्र काल अचानक शंभूचे निधन झाले.शंभूच्या अंत्यदर्शनाच्या वेळी प्राणीमात्रावर प्रेम करणारांची मांदियाळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत