सोनेवाडी(वेबटिम) आनंद.. उल्हास.. हास्य.. एक विरंगुळा.. ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेटी.. शिस्त अशा अनोख्या सहलीने कोपरगाव तालुक्यातील सोनेव...
सोनेवाडी(वेबटिम)
आनंद.. उल्हास.. हास्य.. एक विरंगुळा.. ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेटी.. शिस्त अशा अनोख्या सहलीने कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी भाराहुन गेले. मुरुड जंजीरा सह अनेक ऐतिहासिक स्थळाचे दर्शन घेत मुंबई फिरण्याचा आनंद चिमुकल्यांनी घेतला.
काल मंगळवारी पहाटे 3 वाजता सोनेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सहल कोपरगांव डेपो च्या एस टी बस मधुन निघाली. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य चिलु जावळे व मोहन जावळे यांनी एसटी बस ची पूजा करत सहलीला हिरवा कंदील दिला.
गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब मोकळ, शिक्षक सुरेश धनगर, विलास गवळी, प्रवीण खंडीझोड, श्रीमती सविता पानसरे, श्रीमती मंगल आव्हाड व एसटी बसचे वाहक श्री खेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांसह मुंबई दर्शनाची जबाबदारी स्विकारत चिमुकल्यांच्या आनंदात चार चांद लावले. श्रीक्षेत्र ओझर विघ्नहर गणपतीचे दर्शन घेत लोणावळा येथे विद्यार्थ्यांनी भेट देत समुद्रात बोटीचा आनंद घेत मुरुड जंजिरा बघीतला. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करत विद्यार्थ्यांनी गड किल्ला सवारीचा आनंद लुटला. यानंतर बुधवारी मुंबई अलिबाग दर्शन घेऊन ही सहल पुन्हा सोनेवाडी येथे परतणार आहे. सहलीचे सर्व नियोजन मुख्याध्यापकांसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक करत आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत