राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील शाळा व महाविद्यालयीन टारगट मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे ऍक्शनमोड मध्ये आले ...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील शाळा व महाविद्यालयीन टारगट मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे ऍक्शनमोड मध्ये आले असून डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक तैनात करण्यात आले असून आता टारगट मुलांवर चांगलाच वचक बसणार आहे.
राहुरी तालुक्यात शहरासह, देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी, टाकळीमिया येथे शाळा,महाविद्यालय परिसरात अनेक टुकार मुले फिरत असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या पर्यंत पोहोचल्यानंतर तातडीने फिरते पथक तैनात करून विनाकारण फिरणाऱ्या मुलांवर महाविद्यालयीन आईडी कार्ड चेक केले परंतु ते तेथील विद्यार्थी म्हणून आढळून न आल्याने त्यांच्या गाडीची हवा सोडून देण्यात आली. तसेच उठा बश्याची शिक्षा दिली. काहींना लाठीचा प्रसाद मिळाला.
यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अशोक शिंदे, आजिनाथ पाखरे,सुनील ताजणे, प्रमोद ढाकणे, नदीम शेख आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत