आरपीआय आंबेडकर पक्षाचे २० जानेवारीला श्रीरामपूरला आंदोलन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आरपीआय आंबेडकर पक्षाचे २० जानेवारीला श्रीरामपूरला आंदोलन

श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर येथील फेथ ए. जी चर्च येथे अनधिकृत  लोकांचे अतिक्रमण आणि बेकायदेशीर हस्तक्षेपाविषयी वारंवार पोलीस प्रशासनाला नि...

श्रीरामपूर(वेबटीम)



श्रीरामपूर येथील फेथ ए. जी चर्च येथे अनधिकृत  लोकांचे अतिक्रमण आणि बेकायदेशीर हस्तक्षेपाविषयी वारंवार पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन अद्याप कुठलीही कार्यवाही न झाल्याने राहुरी तालुका आरपीआय आंबेडकर पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांच्या नेतृत्वाखाली  २० जानेवारी श्रीरामपूर पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहे.




याबाबत दिलेल्या निवेदनात म्हंटले की, श्रीरामपूर येथील फेथ ए. जी. चर्चमधील अनाधिकृत लोकांचे अतिक्रमण आणि बेकायदेशीर हस्तक्षेपाविषयी दाखल प्रकरणाबाबत वारंवार वैयक्तिक भेटून आणि लेखी तक्रारी देऊनही हेतुपुरस्सरपणे ह्याप्रकरणाबाबत दिरंगाई होत असून  चर्च मध्ये भाविक स्त्रिया आणि पुरुष आणि इतर जनतेचे घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होत असून पोलीस प्रशासन कोणताही हस्तक्षेप करीत नाही.




 या चर्चमध्ये अनाधिकृत लोक येऊन स्थानिक भाविक आणि चर्च सभासद आणि स्थानिक पाळकाला गुंडागर्दी करणे, दमदाटी करणे, चर्चला कुलूप लावने, स्त्रियांच्या अंगावर धावून जाणे, लजास्पद वर्तन करणे, चर्चमध्ये उपासना करून न देणे, स्थानिक पाळक सचिन चक्रनारायण यांना त्यांच्या लहान मुलांसह त्यांचे स्थानिक निवासी घर खाली करण्यास जबरदस्ती करणे, स्थानिक चर्च मधील भाविकांना चर्च चालू असताना मध्येच अडथळा निर्माण करणे आणि त्यांच्या अनाधिकृत संस्थेचे सभासद फॉर्म्स भरून सभासद बनण्यास भाग पडणे इत्यादी घडत आहे पोलिसांना वारंवार निवेदन देऊन कुठलीही कार्यवाही झाली नाही.

त्यामुळे २० जानेवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या आदेशानुसार दक्षिण जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, जिल्हा अध्यक्ष राकेश कापसे, जिल्हा सचिव राजन ब्राम्हणे, युवक जिल्हा अध्यक्ष रॉकी लोंढे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष श्रीकांत म्हकाळे, श्रीरामपूर शहर अध्यक्ष शुभम शेळके आदी पदाधिकाऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडणार आहे.


हे निवेदन देते वेळी धर्मगुरू सचिन चक्रनारायण, विलास शेळके, राहुल भोसले, शंकर शेळके,सचिन ब्राम्हणे, सोनाली देठे आदिंसह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.



*आंदोलनाचे मुद्दे*


1. भारतीय नागरिकांची घटनात्मक अधिकारांची पायमल्ली थांबवावी.


2. बनावट कागदपत्राद्वारे निवृत्त पोलीस अधिकाऱ्याद्वारे पोलिस प्रशासनाची दिशाभूल आणि स्थानिक ख्रिस्ती मंडळींवर अन्याय, गुंडागर्दी करणाऱ्याना पोलिसप्रशासनाद्वारे अभय देऊ नये.


3. साऊथ इंडिया असेम्ब्लीज ऑफ गॉड संस्थेचे अधिकारी बनावट आहेत, त्यांची कसलीही नोंद  धर्मादाय आयुक्त कार्यालयात नाही. पोलीस प्रशासनाने त्यांच्या अधिकारांची आणि संस्थेच्या स्तत्यतेची पडताळणी करावी आणि फसवणूक प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत


सबब बनावट संस्था साऊथ इंडिआ असेम्ब्लीज ऑफ गॉड हि. किंवा त्याचे लोक चाळीसवर्षे कधीच कोरोना कार्यकाळांत धर्मगुरू स्वर्गीय मधुकर देठे ह्यांचे कोरोना मुळे कुपोषण झाले आणि त्यातच ते मृत्यू पावले तेव्हापर्यंत कोणीच अस्तित्वात नकते. दुर्दैवी अवस्थेत त्यांची काळजी घेतली नाही किंवा त्यांना अत्यवस्थ परिस्थितीत कसलीही मदत केली नाही कि विचारते नाही सबब संस्थेची चौकशी करून असत्या बोगस संस्था शासनाने रद्द कराव्यात


  अचानक केवळ चर्च प्रॉपर्टी बळकावण्याच्या उद्देशाने कोणतेही कागदपत्र नसताना. सबद संस्थेचे बनावट अधिकारी चर्च तावा घेऊन मंडळीला गुंडागर्दी करून ताबा घेऊ पाहात आहेत.


सध्याचे धर्मगुरू पास्टर सचिन चक्रनारायण हे स्थानिक मंडळीने सन २०१३ पासून स्वर्गीय धर्मगुरूने रेव्ह मधुकर देठे ह्यांच्या द्वारे त्यांची प्रतिष्ठापना सन २०१९ मध्येच केले असून साऊथ इंडिया असेम्ब्लीज ऑफ गॉड संस्थेता किंवा पोलीस प्रशासनाला त्यांच्या नियुक्तीता आव्हान देण्याचा कोणताच अधिकार नाही. कारण आम्ही मंडळीतील स्थानिक लोक ४० वर्षांपासून येथील सभासद असून आम्ही त्यांची नेमणूक केली आहे आणि केवळ एका निवृत्त पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रभावाखाली न्यायप्रविष्ट प्रकरण असताना पोलीस प्रशासनाने स्थानिक धर्मगुरूविरुद्ध मागील ४० वर्षांच्या चर्चमधील वास्तव्यास असताना आणि त्यांचे विधी उपासना करण्याकरिता कलम ४४७ अन्वये अतिक्रमणाचा अतिक्रमणाचा गुन्हा दाखल केला आहे तो न्यायालयातून रद्द करावा.


 "बेकायदेशीर संस्थेच्या लोकांनी स्थानिक स्त्रिया आणि वृद्ध व्यक्तींना ढकलून देणे अश्लील भाषा वापरणे आणि लज्जास्पद वर्तन करतानाचे निवेदन देऊनही कोणालाही अटक नाहि किंवा कोणतीही दाखल नाही. करिता मंडळीतील स्त्रिया आई बहिणींसोबत लज्जास्पद वर्तणाबद्दल गुंडांना अटक करा.


चर्चमध्ये जाण्याच्या भक्ती करण्याच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवलायाबाबत संस्थेच्या लोकांविरुद्ध घटनेचा अपमान करणे आणि घटनेतील


अनुच्छेद कलम २५ विवेकाचे स्वातंत्र्य आणि मुक्त व्यवसाय, धर्माचे आचरण आणि प्रचार


अनुच्छेद कलम  26  धार्मिक व्यवहार व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य. ह्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत.


भाविक, स्थानिक नागरिक पालक ह्यांना मुक्तपणे स्त्रियांना भक्तीसाठी मंदीर खुले करून द्यावे. त्याव्यतिरकीत न्यायप्रविष्ट बाबतीत पोलिसांनी दहशत आणि हस्तक्षेप करू नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत