राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येथील डॉ.तनपुरे कारखाना कामगार वसाहत येथील एका घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी तत...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
येथील डॉ.तनपुरे कारखाना कामगार वसाहत येथील एका घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्परता दाखविल्याने काही क्षणात आग आटोक्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हॉलीबॉल ग्राऊंड शेजारी असलेल्या कारखाना कॉलनीतील संजय ईघे यांच्या घरातील स्वयंपाक घराला अचानक आग लागली. यावेळी घरातील मधल्या खोलीत असलेल्या ईघे यांच्या आईला आगेचा लोळ दिसून आला त्यांनी तातडीने बाहेर पडून मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला.याचवेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली मात्र आग विजवण्यासाठी कोणीही धजावत नव्हते.
याचवेळी प्रसंगावधान राखत किरण चव्हाण व प्रमोद विधाटे या दोन तरुणांनी स्वयंपाक घरात प्रवेश करून पाणी मारून आग तातडीने विझवली.
यावेळी शांती चौक मित्र मंडळाचे दिपक त्रिभुवन, किशोर कोबरने,सचिन सरोदे,शाम सूर्यवंशी,प्रमोद काळकुंड,सतीश वाघ,प्रणय भोसले,सीताराम नालकर यांच्यासह देवळाली नागरपालिकेच्या अग्निशमन दलाचे सुनील कल्हापुरे व कर्मचाऱ्यांनी मदतकार्य केले.
दरम्यान विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून परिसरातील तरुणांनी तातडीने मदतकार्य केल्याने पुढील होणारी वित्तहानी टळली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत