देवळाली प्रवरात उद्या मंगळवारी मोफत सर्वरोग निदान शिबिर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात उद्या मंगळवारी मोफत सर्वरोग निदान शिबिर

देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांच्या वाढदिवसानिमित्त लाईफ इन ...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांच्या वाढदिवसानिमित्त लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.३१ जानेवारी रोजी सकाळी १० ते ५ यावेळत मोफत सर्व रोग निदान व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.


देवळाली बाजारतळ येथे संपन्न होणाऱ्या या शिबिरात या शिबिरात डोळे तपासणी व डोळयांचे ड्रॉप वाटप व नंबरचे चष्मे माफक दरात वाटप करण्यात येणार असून ब्लड प्रेशर, शुगर तपासणी डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, त्वचेचे आजार, पोटाचे विकार, मणक्याचे आजार अशा सर्व आजारांवर मोफत औषधे वाटप तसेच गुडघेदुखी, कंबरदुखी, हात पाय दुखणे, सांधेवात, मानदुखी, या सर्व आजारांवर आयुर्वेदिक, थेरपी मोफत करण्यात येणार आहे. अपेंडिक्स, हर्निया, मुळव्याध, फिशर याची मोफत तपासणी केली जाईल. व तसेच ऑपरेशन असल्यास हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात केले जाणार आहे.


तरी गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठान व लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने करण्यात आले असून आधिक माहितीसाठी ९७३०४६४५४७, ९०६७३२८४८४, ८४२१६९६९०९, ९८२२४३३०६४ या क्रमांकावर संपर्क करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत