अहमदनगर(वेबटीम) येत्या ३० जानेवारी रोजी नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक होत असून या निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार रतन बनसोडे यांना पदव...
अहमदनगर(वेबटीम)
येत्या ३० जानेवारी रोजी नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक होत असून या निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार रतन बनसोडे यांना पदवीधर मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने बनसोडे यांना पाठींबा दर्शविला आहे.त्यामुळे बनसोडे यांचे पारडे दिवसेंदिवस जड होताना पहावयास मिळत आहे.
वंचितचे रतन बनसोडे यांनी सामाजीक न्याय विभागात उपायुक्त म्हणून सेवा केलेली असून त्यांना प्रशासनातील अतिशय दांडगा अनुभव आहे. ते सध्या पूर्ण वेळ सामाजिक/राजकीय कामामध्ये प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे समवेत काम करीत आहेत. त्यांचा समाजातील दुर्बल, सुशिक्षीत बेरोजगार, इंजिनिअर, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व समावेशत ते काम करतील यांची खात्री असल्याने महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटना यांनी वंचितचे उमेदवार रतन कचरू बनसोडे यांना जाहीर पाठींबा दिला आहे.
नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार येथील सर्व संघटनेच्या पदाधिकारी, सभासद यांनी रतन बनसोडे यांना प्रथम पसंती देऊन अ. क्र. १ ला मतदान करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटना यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत