सात्रळ(वेबटीम) परीक्षेच्या सर्व वातावरणातून विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'परीक्षा पे...
सात्रळ(वेबटीम)
परीक्षेच्या सर्व वातावरणातून विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'परीक्षा पे चर्चा' उपक्रमांतर्गत पद्मभूषण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ (ता. राहुरी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानात १११ विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभागी झाल्याची माहिती महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर यांनी दिली.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आज "परीक्षा पे चर्चा" कार्यक्रमांतर्गत देशभरातील विद्यार्थ्यांशी सलग सहाव्या वेळीही या नवोपक्रमाद्वारे संवाद साधला. दृकश्राव्य माध्यमाद्वारे स्थानिक विद्यार्थ्यांनाही या कार्यक्रमामुळे आत्मविश्वास वाढून प्रेरणा मिळाली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, कार्यालयीन अधीक्षक श्री. विलास शिंदे, श्री. महेंद्र तांबे, परीक्षा पे चर्चा उपक्रमाचे समन्वयक प्रा. सोमनाथ बोरुडे, डॉ. नवनाथ शिंदे, प्रा. आदिनाथ दरंदले, डॉ. अनंत केदारे आदिंसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत