विलास गभाले यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विलास गभाले यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार

सात्रळ/वेबटीम:- रयत शिक्षण संस्थेचे नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय, सात्रळ येथील उपशिक्षक श्री. विलास गभाले  यांना रयत शिक्षण संस्थेच्या...

सात्रळ/वेबटीम:-


रयत शिक्षण संस्थेचे नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय, सात्रळ येथील उपशिक्षक श्री. विलास गभाले  यांना रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत दिल्या जाणा-या पुरस्कारांमध्ये उपक्रमशील शिक्षक पुरस्कार समारंभ नुकताच रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग सल्लागार समितीचे अध्यक्ष मान.आमदार आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

       रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त नामावंत व्यक्ती काॅ.पी.बी.कडू पाटील, भास्करराव गलांडे, बापूसाहेब भापकर, हिराबाई भापकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो.

       श्री गभाले  यांना बापूसाहेब भापकर,आणि हिराबाई भापकर यांच्या स्मरणार्थ उपक्रमशील शिक्षक पुरस्कार सन-२०१९-२० जाहीर झाला होता.परंतु कोविड-१९ संसर्गजन्य महामारीमुळे वितरण होऊ शकले नव्हते.शनिवार दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी उत्तर विभागीय कार्यालय,रयत शिक्षण संस्था अ.नगर आयोजित शिक्षकांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

      या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा.आशुतोषदादा काळे,रयत शिक्षण संस्थेचे,व्हा.चेअरमन भगीरथ काका शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, बाळासाहेब बोठे,राजेंद्र फाळके तात्या जनरल बाॅडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे,प्रा.ए.टी.पोकळे विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर सहाय्यक विभागीय अधिकारी काकासाहेब वाळुंजकर, शिवाजीराव तापकिर आदि मान्यवर उपस्थित होते.

        सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून नुकतच अपघाती निधन झालेले प्राचार्य राजेंद्र बर्डे सर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व शिक्षकांना गौरविण्यात आले.

      श्री  गभाले यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार मा.आमदार आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

       विलास गभालेंना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, स्कूल समितीचे सदस्य,ॲड विजयराव कडू, संभाजीराव चोरमुंगे, भास्करराव फणसे,शांतीभाऊ गांधी, किशोरशेठ भांड, युवानेते किरण कडू,पंकज कडू, प्राचार्य किशोर ससाणे, भाऊसाहेब पेटकर, प्राचार्य सिराज मन्सुरी पर्यवेक्षिका सुशिला थोरात, पंचक्रोशीतील सर्व शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ, सर्व सेवकवृंद आणि विद्यार्थी या सर्व स्तरातून गभाले  यांचे अभिनंदन होत आहे.

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक विभागीय अधिकारी श्री काकासाहेब वाळूंजकर यांनी केले.तर सहायक विभागीय अधिकारी श्री शिवाजीराव तापकीर यांनी आभार प्रदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत