कोपरगाव(वेबटीम) रविवार १ जानेवारी २०२३ रोजी कोपरगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ मर्यादित संस्थची निवडणूक पार पडली.या न...
कोपरगाव(वेबटीम)
रविवार १ जानेवारी २०२३ रोजी कोपरगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ मर्यादित संस्थची निवडणूक पार पडली.या निवडणुकीत कोल्हे गट व काळे गट समोरा समोर रिंगणात असतांना काळे गटाचा धुवा उडवुन कोल्हे गटाने विजयाचा गुलाल उधळत नववर्षाची विजयी सुरवात केली आहे.
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,भाजपा प्रदेश सचिव मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह कारखाना चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली प्रगती विकास मंडळाचे सर्वच्या सर्व ११ सदस्य बहुमताने विजयी झाल्याने मतदारसंघाचा कौल कोल्हे गटाला मिळाल्याचे सिद्ध झाले आहे.
तब्बल ४० वर्षांनी झालेली ही निवडणुक प्रतिष्ठेची बनली होती त्यात कोल्हे गटाने बाजी मारत सरस असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.कोपरगाव व राहता तालुक्यातील मतदार या प्रक्रियेत होते त्यात मतदारसंघाने कोल्हे गटाला प्राधान्य देऊन आमदार आशुतोष काळे यांच्या गटाला मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले.चुरशीच्या या निवडणुकीत मतदार एकतर्फी कोल्हे गटाकडे झुकले असल्याचे चित्र होते त्यात मोठ्या फरकाने काळे गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाल्याने मोठा चर्चेचा विषय बनला आहे.
ग्रामीण जनजीवनाशी निगडित असणाऱ्या या सहकारी संस्था विकासाची नाळ जोडणाऱ्या वाहिन्या असतात व त्यातून गोर गरिबांची कामे मार्गी लावता येतात अशी शिकवण माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांची आहे व तोच विचार सौ.स्नेहलताताई कोल्हे व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी पुढे जोपासत कामाचा वेग सुरू ठेवला आहे.या दुरदर्शी विचारावर काम करणारे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी विजय खेचून आणण्यासाठी घेतलेली मेहनत व नेतृत्वावर जनमताचा अपार विश्वास फळाला आल्याने एकच जल्लोष मतदान केंद्रावर बघायला मिळाला.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-
सर्वसाधारण जागा-गुरसळ संजय किसन(३४९),चव्हाण दादासाहेब सखाहरी(३४३),चव्हाण भिकाजी गोकुळ(३३२),पगारे दत्तात्रय विठ्ठलराव(३४१),वक्ते कर्णासाहेब रामचंद्र(३४६),वक्ते कोंडीराम संपत(३४३).
महिला राखीव-पगारे शैला उमेश(३४७),शिंपी रजनी फकिरा(३३१).
अनु.जाती जमाती-गायकवाड दिपक सिताराम(३४२)
इतर मागास प्रवर्ग-पगारे सुरेश अंबादास(३६५)
भविजा/जमाती/विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी - फटांगरे नामदेव कारभारी (३६१)
प्रगती विकास मंडळ पॅनलचे अध्यक्ष मधुकर वक्ते,शिवाजीराव वक्ते,भीमराव वक्ते,बाळासाहेब वक्ते,शरदनाना थोरात,सतिषराव आव्हाड,विठ्ठलराव आव्हाड,आनंदा चव्हाण,तुळशीदास पगारे,दिपकराव गायकवाड,आनंदराव चव्हाण,बाळासाहेब चव्हाण,बाजीराव वक्ते,फकिरराव शिंपी,भीमा संवत्सरकर,संजय होन,मिलन चव्हाण,जालिंदर चव्हाण आदिंसह पदाधिकारी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत