देवळाली प्रवरा नगरपरिषदेकडून पथनाट्याच्या माध्यमातून कचरा वर्गिकरणाचा संदेश ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपरिषदेकडून पथनाट्याच्या माध्यमातून कचरा वर्गिकरणाचा संदेश !

  देवळाली प्रवरा(वेबटीम) स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत देवळाली प्रवारा नगरपरिषद व सोशल लॅब एन्व्हायरमेंटल सोल्यूशन प्रा. ...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)





स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत देवळाली प्रवारा नगरपरिषद व सोशल लॅब एन्व्हायरमेंटल सोल्यूशन प्रा. लि. यांच्या वतीने शहरातील नागरिकांना स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यासाठी पथनाट्य सादरीकरण विषय स्वच्छ सुंदर हरित शहर,कचरा वर्गीकरण, प्लास्टिक मुक्त शहर, हागणदारी मुक्त शहर , सौर ऊर्जेचा वापर, झाडे लावा झाडे जगवा,व जलसंधारन या संदर्भात नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.पथनाट्याचे मार्गदर्शक मा. मुख्याधिकारी. अजित निकत, शहरात विविध ठिकाणी कचरा वर्गीकरण, स्वच्छ  सुंदर हरित शहर,  प्लास्टिक मुक्त शहर, हागणदारी मुक्त शहर, सौर ऊर्जेचा वापर,झाडे लावा झाडे जगवा,व जलसंधारन वरील विषयी नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. 


यावेळी मुख्याधिकारी अजित निकत, प्रशासक अनिल पवार,नोडल ऑफिसर अमोल दातीर, शहर समन्वयक उदय इंगळे  उपस्थित होते.


 देवळाली नगरपरिषदेचा इतर कर्मचारी वर्ग तसेच पथनाट्य सादर करते श्री.रोहित पुराणिक, पृथ्वी खेगटें,प्रवीण पारधे,साधना विटोरे, सोनाली नाईक, सुदर्शन भिवसने, व मनोज चव्हाण यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी सोशल लॅबचे प्रतिनिधी श्री.बालाजी कदम,योगेश झिंजूर्डे, धमदीप शिरसाठ, संतोष, ज्योती, मनीषा यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत