देवळाली प्रवरा(वेबटीम) श्रीरामपूर येथील फेथ ए. जी चर्च येथे अनधिकृत लोकांचे अतिक्रमण आणि बेकायदेशीर हस्तक्षेपाविषयी वारंवार पोलीस प्रशासन...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
श्रीरामपूर येथील फेथ ए. जी चर्च येथे अनधिकृत लोकांचे अतिक्रमण आणि बेकायदेशीर हस्तक्षेपाविषयी वारंवार पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन अद्याप कुठलीही कार्यवाही न झाल्याने राहुरी तालुका आरपीआय आंबेडकर पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रदीप मकासरे यांनी मुंबई येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांची भेट घेतली. यावेळी निकाळजे यांनी आंदोलनासंदर्भात मार्गदर्शन केले.
श्रीरामपूर येथील फेथ ए. जी. चर्चमधील अनाधिकृत लोकांचे अतिक्रमण आणि बेकायदेशीर हस्तक्षेपाविषयी दाखल प्रकरणाबाबत वारंवार वैयक्तिक भेटून आणि लेखी तक्रारी देऊनही हेतुपुरस्सरपणे ह्याप्रकरणाबाबत दिरंगाई होत असून चर्च मध्ये भाविक स्त्रिया आणि पुरुष आणि इतर जनतेचे घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होत असून पोलीस प्रशासन कोणताही हस्तक्षेप करीत नाही.
या चर्चमध्ये अनाधिकृत लोक येऊन स्थानिक भाविक आणि चर्च सभासद आणि स्थानिक पाळकाला गुंडागर्दी करणे, दमदाटी करणे, चर्चला कुलूप लावने, स्त्रियांच्या अंगावर धावून जाणे, लजास्पद वर्तन करणे, चर्चमध्ये उपासना करून न देणे, स्थानिक पाळक सचिन चक्रनारायण यांना त्यांच्या लहान मुलांसह त्यांचे स्थानिक निवासी घर खाली करण्यास जबरदस्ती करणे, स्थानिक चर्च मधील भाविकांना चर्च चालू असताना मध्येच अडथळा निर्माण करणे आणि त्यांच्या अनाधिकृत संस्थेचे सभासद फॉर्म्स भरून सभासद बनण्यास भाग पडणे इत्यादी घडत आहे. पोलिसांना वारंवार निवेदन देऊन कुठलीही कार्यवाही झाली नाही.
यावेळी आरपीआय आंबेडकर पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांनी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे व राकेश कापसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशसनाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला होता.
यानंतर प्रदीप मकासरे यांनी मुंबईत आरपीआय आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी दीपक निळाळजे यांनी याविषयी मार्गदर्शन करून अन्याय होत असेल तर आवाज उठविला पाहिजे. जर यावर पोलीस प्रशासनाने दखल न घेतल्यास आरपीआय कार्यकर्ते धडा शिकलव्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा दीपक निकाळजे यांनी दिला.
यावेळी अँड.रेव्ह.विकास वाघमारे , श्रीरामपुर ए.जी.चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह.सचिन चक्रनारायण आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत