स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची उत्तम संधी - आ.कानडे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची उत्तम संधी - आ.कानडे

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. त्याबाबत विद्यार्थ्यांनी योग्य ध्येय निश्चिती ...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. त्याबाबत विद्यार्थ्यांनी योग्य ध्येय निश्चिती करून व योग्य मार्गदर्शन घेऊन सराव केल्यास यश नक्कीच मिळते असे प्रतिपादन  आ.लहू कानडे यांनी केले.


राहुरी फॅक्टरी येथील श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण आ.कानडे यांच्या हस्ते पार पडले.प्रसंगी ते बोलत होते


 नुकत्याच एमपीएससीमार्फत अनेक पदांची भरती सुरू आहे. यात लिपिक टंकलेखक या पदासाठी 7034 जागांची भरती सुरू याबाबत जाहिरात प्रसारित झाली आहे याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. व इतरही नवीन नवीन भरती प्रक्रिया सुरू राहील यासाठी शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सहकार्य केले जाईल असे आ. लहु कानडे  म्हणाले.


 यावेळी  दत्तात्रय भाऊसाहेब  कडू यांची एमपीएससी मार्फत औद्योगिक इन्स्पेक्टरपदी निवडझाल्याबद्दल आ.लहू कानडे व ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 


यावेळी सौ. जयश्री सावरे, सार्थक म्हैस, व इतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी संस्थेचे कामकाज व ॲडमिशन प्रणाली समजून घेऊन संस्थेचे शैक्षणिक कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.  


यावेळी माधुरी दातीर, पूजा अभंग, स्वरांजली रहाणे, सीमा तांबे, प्राची आल्हाडे, सरस्वती शिंदे, रोहिणी रसाळ, एंजल पाटोळे, निलेश वाणी, गौरव निकम, कार्तिक तनपुरे,ऋषिकेश काळे, यश आहेर, कृष्णा कोल्हे, कृष्णा मुसमाडे ,आदी विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित होते. 


यावेळी संस्थेचे प्राचार्य योगेश आंबेडकर व कांचन आंबेडकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत