सिद्धेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राऊत तर उपाध्यक्षपदी बोंडखळ यांची बिनविरोध निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सिद्धेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राऊत तर उपाध्यक्षपदी बोंडखळ यांची बिनविरोध निवड

कोपरगाव(वेबटीम)  तालुक्यातील सोनेवाडी येथील स्व सखाहरी राऊत यांनी स्थापन केलेल्या सिद्धेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपद...

कोपरगाव(वेबटीम)



 तालुक्यातील सोनेवाडी येथील स्व सखाहरी राऊत यांनी स्थापन केलेल्या सिद्धेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रामदास सखाहरी राऊत तर उपाध्यक्षपदी व्यंकट सगाजी बोंडखळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


सन 2022 ते 2027 या काळासाठी पतसंस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात आली. निवडणुकीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक काल संपन्न झाली. निवडणूक प्रक्रियेचे कामकाज आर एन रहाणे यांनी पाहिले. तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे व्यवस्थापक प्रमोद पासलकर यांनी त्यांना मदत केली.

निवडीनंतर अध्यक्ष रामदास राऊत व उपाध्यक्ष व्यंकट बोंडखळ व नुतन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे संचालक धोंडीराम रांधवण, मिराबाई जायपत्रे, राजेंद्र ढवळे, दिलीप सोदक, रावसाहेब मिंड, रवींद्र लांडबले, बाळासाहेब झगडे, हरी माळी ,सुमन माळी , संस्थेचे मार्गदर्शक व्यंकटराव राऊत, बाळासाहेब माळी, साहेबराव फटांगरे, शांताराम जायपत्रे, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष गणपत राऊत, विजय फटांगरे भिवराज राऊत, राजेंद्र बोंडखळ, भिकाजी बोंडखळ वसंतराव बोंडखळ, भगाजी मिंड ,अरविंद घोंगडे, दीपक घोंगडे, नाना बत्तीशे, गंगाराम सरोदे, बाळासाहेब जावळे, भिमाजी जायपत्रे, जनार्दन वायसे, परसराम जगताप ,अशोक घोडेराव, शिवाजी बोंडखळ, प्रभाकर खारतोडे ,संजय राऊत, मच्छिंद्र बोंडखळ, ज्ञानदेव सरोदे, बापूराव पासलकर अदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष गणपत राऊत त्यांनी सांगितले की स्व. सखाहरी राऊत यांनी ही  पतसंस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केली. शेतकरी व सर्वसामान्यांच्या मुलांना व्यवसायात उतरण्यासाठी त्यांनी संस्थेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले गाई गोठा व दुग्ध व्यवसायाला त्यांनी वाव दिली त्यामुळेच आज प्रत्येक सभासदाच्या घरी दुधाळ गाई दिसून येत आहे. त्यांनी जोपासलेली सभासदां प्रति असलेली बांधिलकी नूतन अध्यक्ष राऊत व उपाध्यक्ष बोंडखळ जोपासतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पासलकर यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष रामदास राऊत यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत