देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री.साई प्रतिष्ठान व शहरवासियांच्यावतीने गेल्या आठवड्यात महंत उद्धव महाराज म...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री.साई प्रतिष्ठान व शहरवासियांच्यावतीने गेल्या आठवड्यात महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली साई पारायण व कीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. राज्यातील अनेक नामवंत किर्तनकारांची कीर्तने पार पडली.या किर्तनांना शहरवासियांनी मोठ्या संख्यने हजेरी दर्शवत हरिनामाचा आनंद लुटला. मात्र या कीर्तन महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील श्री. क्षेत्र मेहुल येथील ह.भ.प विशाल महाराज खोले यांनी आपल्या अनोख्या शैलीत कीर्तनसेवा देऊन उपस्थित नागरिकांची मने जिंकली. विशाल महाराज खोले यांचे कीर्तन तरुण वर्गात आकर्षण ठरले आहे.
या कीर्तनात खोले महाराज यांनी आपल्या सुरेल आवाजात अनेक अभंग व खास करून 'दाताच दात्वन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ मणी दाताच दात्वन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ मणी बाई सूया घे ग दाभन घे' हे भारुड सादर करून उपस्थित भाविकांबरोबर तरुणांची मने जिंकली.
*विशाल महाराज खोले यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ*
खोले महाराज यांचे कीर्तन होऊन तब्बल आठ दिवस उलटले असले तरी त्यांनी गायलेले अभंग तसेच भारुड तरुणाई विसरायला तयार नाही. देवळाली प्रवरा व परिसरातील तरुणांनी व्हाट्सअप स्टेट्सवर विशाल महाराज खोले यांनी गायलेले अभंग व भारुड दिसून येत आहे.
साई प्रतिष्ठानचा पारायण व कीर्तन महोत्सव गावातील सर्व धर्मीय तरुण एकत्रित करून नियोजित करतात. या प्रतिष्ठनमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष असा कुठलाही पदाधिकारी नाही. सर्व मिळून साईंचे कार्य पुढे नेण्याचे काम करत आहे. गेल्या ९ वर्षांपासून हा ज्ञान व अन्नदान यज्ञ अविरतपणे सुरू आहे. मात्र यंदाच्या कीर्तन महोत्सवात गावातील तरुणांची गर्दी दररोज पहावयास मिळाली आणि आजही विशाल खोले यांच्यासह अनेक किर्तनाचे व्हीडिओ व्हॉट्सअप स्टेट्सवर अपलोड करून आनंद लुटत असल्याने हा सोहळा सफल झाला असल्याची प्रतिक्रिया शहरवासियांतून येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत