राहुरी(वेबटीम) वाढदिवस म्हंटल की अवास्तव खर्च, हॉटेलात पार्टी आणि आणखी बरच काही केले परंतु यासर्व गोष्टीला फाटा देत राहुरी तालुक्यातील ब्र...
राहुरी(वेबटीम)
वाढदिवस म्हंटल की अवास्तव खर्च, हॉटेलात पार्टी आणि आणखी बरच काही केले परंतु यासर्व गोष्टीला फाटा देत राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड येथील मुसमाडे दांपत्याने आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित शाळेला २५ लिटर क्षमतेचस पिण्याच्या पाण्याचे फिल्टर देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
ब्राम्हणगाव भांड येथील के.एस.ऍग्रोचे सर्वेसर्वा प्रमोद मुसमाडे व सौ. मुसमाडे यांच्या लग्नाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त कुठलाही बेडजाव न करता काळे-भांड वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या हेतूने २५ लिटर क्षमतेचे फिल्टर मशीन भेट दिले आहे.
यावेळी मुख्याध्यापक वारुळे सर, नामदेव भांड आदी उपस्थित होते. आपल्या अनोख्या सामाजिक कार्याने नेहमी चर्चेत असलेल्या प्रमोद मुसमाडे यांच्या या विद्यार्थ्यांची काळजी म्हणून केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यापुढे असेच उपक्रम राबविण्याचा अनेकांचे संकल्प
प्रमोद मुसमाडे यांनी लग्नाचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा न करता सामाजिक उपक्रम राबविल्याने अनेक तरुणांनी वाढदिवस, लग्न वाढदिवसानिमित्त असेच सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प सोडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत