विखेंचे राजकीय पंख छाटण्याचा प्रयत्न? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विखेंचे राजकीय पंख छाटण्याचा प्रयत्न?

   एस जी- काँग्रेसने कोरा एबी फॉर्म दिला असताना त्यावर सत्यजित याना अधिकृत उमेदवारी करता आली असती, मग त्या फॉर्मचा वापर टाळून अपक्षचं का, ज्...

 


 एस जी-काँग्रेसने कोरा एबी फॉर्म दिला असताना त्यावर सत्यजित याना अधिकृत उमेदवारी करता आली असती, मग त्या फॉर्मचा वापर टाळून अपक्षचं का, ज्या नाशिक पदवीधर मतदार संघात सलग दोन टर्मपासून काँग्रेसचे अर्थात तांबे घराण्याचेच वर्चस्व आहे, मग त्या ठिकाणी सत्यजित तांबेना आताच भाजपच्या मदतीची गरज का वाटावी, मामांच्या निष्ठेवर बोट ठेवणारा हा निर्णय त्यांना टाळून होऊ शकतो का, असे एक ना अनेक प्रश्न जनतेसमोर पडले असताना त्याचे वरवर तरी एकच उत्तर पुढे येते ते म्हणजे विखे पाटलांचे राजकीय पंख छाटण्याचा हा सुनियोजित गेम आहे. 

       होय, काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात विखे पाटलांचे वाढते वजन आता पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत चांगलेच खूपू लागल्याची चर्चा आहे. त्यात सहकार परिषदेनंतर विखें पाटलांचे थेट मोदी-शहा कनेक्शन विशेषतः भाजपच्याच काही नेत्यांना राजकीय भीतीदायक वाटू लागले आहे. महाराष्ट्रात विखे पाटील हे एक मराठा चेहरा म्हणून झपाट्याने पुढे येत आहे, सहकाराचा मोठा वारसा आहे, अनुभव पाठीशी आहे, राजकीय मुत्सद्दीपणाही आहे, जनमत आणि सर्वच पक्षातील संपर्क पाहता त्यांच्याकडे भाजपमध्ये देखील बहुसंख्य आमदारांचे पाठबळ आहे. केंद्रातही त्यांचे गुडविल आहे.  त्यामुळे भविष्यात मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांच्यासाठी खुणावत असल्याने ही बाब कोणताही धूर्त राजकारणी नजरेआड करणार नाही. नगरमधील अंतर्गत विरोधकांनी यापूर्वीही विखे पाटलांच्या तक्रारी मुंबई दरबारी केल्या आहेतच, म्हणूनच की काय विखे पाटलांचे राजकीय पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू झाल्याचे बोलले जाते. याचाच एक भाग म्हणजे जिल्हा विभाजनाचा विषय आणि आता नाशिक पदवीधर मधील घडामोडी.                                                                      इकडे विखे पाटील थोरातांना क्षणक्षणाला पाण्यात पाहत असताना, नव्हे तर सत्ता बदलानंतर थेट थोरातांच्या महसुलची चौकशी लावू इच्छित असताना दुसरीकडे फडणवीस हे थोरातांचे भाचे सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनाला जातात, तिथे मामा-भाच्यांचे गोडवेही गातात, हा विखेना शह का समजू नये. त्यात आता नाशिक पदवीधर मतदार संघात डॉ. राजेंद्र विखे पाटलासारखा विजयाची क्षमता असणारा उमेदवार भाजपकडे असतानाही त्यांना पक्षाने का थांबवले, शिवाय विखेंचेच कट्टर विरोधक असलेल्या माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्या विरोधात पक्षाचा दुसरा कोणता उमेदवारही दिला नाही. विखे पाटलांची भूमिका मतदार संघात निर्णायक ( नाशिक मतदार संघात नगरमध्ये 48 टक्के मतदान आहे) असताना त्यांना विचारात का घेतले नाही, इकडे माजी आमदार डॉ सुधीर तांबे देखील काँग्रेसचा एबी फॉर्म असताना अर्ज दाखल करत नाहीत, सत्यजितही काँग्रेसचा कोरा एबी फॉर्म जवळ असताना ( नाना पटोले म्हणतात तसे) अपक्ष अर्ज का भरतात, त्यानंतर सत्यजित हे भाजपच्या मदतीसाठी फडणवीस यांना ( विखेंना नाही) भेटणार असल्याचे जाहीर करतात, बावनकुळे पाठिंब्याबाबत सकारात्मक दिसतात, या सर्व घडामोडीमुळे पाणी कुठं तरी (प्रवरेत) मुरतंय, हे सांगण्यासाठी कोणत्याही ( फडणवीस सोडून अन्य) ज्योतिष्याची गरज नाही.  भाजपने ही जागा सोडणे, त्यात विखेंचे हाडवैर असलेल्या थोरातांचे भाचे तांबेना सोडणे,  ही जणू विखेंनाच चपराक असल्याचे बोलले जाते.  त्यामुळेच भविष्यात सत्यजित तांबे राज्य मंत्रीमंडळात दिसले तर नवल वाटू देऊ नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत