कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव तालुक्यातील भारत सर्व सेवा संघ पाचेगाव या संस्थेच्या चांदेकसारे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी तब्बल 29...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव तालुक्यातील भारत सर्व सेवा संघ पाचेगाव या संस्थेच्या चांदेकसारे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी तब्बल 29 वर्षानंतर एकत्र आले जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी आपल्या गरजू मित्रांना मदत करण्यासाठी बँकेत सेविंग खाते उघडण्याचा निर्णय घेतला यातून वैद्यकीय सेवा व लग्नासाठी निधी संकलन करण्याचा संकल्प त्यांनी केला उपस्थित असलेल्या माजी शिक्षकांनीही त्यांच्या या कामाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
या मेळाव्याची तयारी गेल्या दोन महिन्यापासून सुरू फोन व प्रत्यक्ष भेट घेऊन अनेकांना निमंत्रण देण्यात आले होते. 1993/ 94 च्या दहावीच्या वर्गाला शिकवणारे माजी शिक्षक श्री प्रकाश उंडे व श्री टाकसाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी किशोर पवार, किशोर लोखंडे, जितेंद्र जमाले, अनिल पवार, सुनील पवार, मायाराम कुमावत,सुभाष लांडगे, सतीश पवार ,भास्कर गुरसळ, ज्ञानेश्वर सोनवणे, राजेंद्र गुरसळ, भाऊसाहेब दहे ,दत्तात्रय दहे, रावसाहेब होन, अकबर सय्यद, संदीप होन, मनीषा पवार/औटी, रेखा दहे/औटी अदी उपस्थित होते.हॉटेल साई मुकुंदा चांदेकरसारे येथे हा मेळावा संपन्न करण्यात आला.किशोर पवार व वर्षा पवार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत मिळेल ते काम करत शिर्डी येथे थ्री स्टार हॉटेल व्यवसायिक होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांच्या उज्वल यशाबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते भारारून गेले त्यांनी उपस्थित असलेल्या सर्व मित्रांना व त्यांच्या सहचारिणी यांना पैठणी व लिनन शर्ट हॉटेल इंदोर पॅलेस च्या वतीने भेट देण्यात आला.इंजिनियर, डॉक्टर, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षक आदींसह शेतकरी असलेले सर्व मित्रांना आपल्या मित्रासोबत भेटताना वेगळा अहंकार व गर्व वाटला नाही हे या मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य राहिले.
माजीशिक्षक प्रकाश ऊंडे व श्री टाकसाळ यांनी चांदेकसारे ग्रामस्थांनी दिलेले प्रेम व 1993 94 च्या विद्यार्थ्यांना कसे घडवले याचे विवेचन केले. हॉटेल साई मुकुंदाचे संस्थापक केशवराव होन व व्यवस्थापक शरद होन यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र जमाले व जयश्री जमाले यांनी केले तर आभार किशोर पवार यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत