राहुरी(वेबटीम) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना राज्यघटनेद्वारे महिलांना सर्वाधिकार दिले आहेत. त्या अधिकारांचा सुयोग्य लाभ घे...
राहुरी(वेबटीम)
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना राज्यघटनेद्वारे महिलांना सर्वाधिकार दिले आहेत. त्या अधिकारांचा सुयोग्य लाभ घेऊन आज महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मिळत आहे. त्यामुळे आजची महिला राष्ट्रपती सारख्या सर्वोच्च पदावर विराजमान झाली आहे. स्नेहल सांगळे यांनी रमाई बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी असून त्यामुळे ग्रामीण भागात महिलांना मंच निर्माण झाला असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांचे स्वीय सहायक प्रविण मोरे यांनी व्यक्त केले.
ते राहुरी येथे रमाई बहुद्देशीय संस्था आयोजित आम्ही सावित्रीच्या लेकी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाई महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष चंद्रकांताताई सोनकांबळे या होत्या. प्रास्ताविकात अध्यक्ष स्नेहल सांगळे यांनी संस्थेच्या स्थापनेचा उद्देश विशद करताना महिलांना रोजगार, सामाजिक, शैक्षणिक स्तर उंचावणे, सर्व क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणे, अन्याय-अत्याचार झाल्यास लढा उभारणे आदी काम करणार असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय, प्रशासकीय, राजकीय आदी क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या सुमारे चाळीस महिलांचा आम्ही सावित्रीच्या लेकी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन व पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय महिला आघाडी सरचिटणीस ऍड. आशा लांडगे, राज्य सचिव लिलाताई ठोसर, मुंबई प्रदेशाध्यक्ष उषाताई रामलू, देवळाली प्रवरा पालिकेच्या माजी नगरसेवक सुनिता सुरेंद्र थोरात, रिपाई तालुका उपाध्यक्ष सुनिल चांदणे, रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष राजू आढाव, तहसीलदार एफ. एस. शेख, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, डॉ. स्वप्नील माने आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्ष स्नेहल सांगळे, उपाध्यक्ष, दत्तात्रय गडाख, सचिव सुरेंद्र सांगळे, सदस्य लता जगधने, वंदना गायकवाड, रुकसाना पटेल, रतन गायकवाड आदींनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकने यांनी केले तर आभार दत्तात्रय गडाख यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत