राहुरी कृषी विद्यापीठ येथील कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी कृषी विद्यापीठ येथील कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा

  राहुरी(वेबटीम) महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामुळे कृषि अभियांत्र...

 राहुरी(वेबटीम)



महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामुळे कृषि अभियांत्रिकी पदवीधारकांवर अन्याय होत असल्याने हे अन्यायकारक धोरण तात्काळ थांबवावे आणि कृषि अभियंत्यांना न्याय मिळेपर्यंत २०२१ व २०२२ च्या परीक्षेला तात्काळ स्थगिती द्यावी. यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रशासकीय इमारतीसमोर धरणे आंदोलन सुरू असून आ.निलेश लंके, माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे यांनी या आंदोलनास पाठींबा दिला असताना आज वंचीत बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन याप्रश्नी मंत्रालयावर आम्ही मोर्चा काढुन विद्यार्थ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने, डॉ.विजय मकासरे, राहुरी शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे  यांनी दिला आहे.



एकीकडे देशभरासह आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना विद्यार्थी धरणे आंदोलन करत आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत आहे.


या आंदोलनात राहुरी, नाशिक ,मालदाड, कराड, कोल्हापूर, मिरजगाव आदिंसह राज्यातील कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत.


अनिकेत थोरात, अक्षय नागरगोजे, जयेश महाजन, हर्षल पेठकर, हर्षल बागुल, ओमकार गुंड, प्रशांत तरंगे, अविनाश नलावडे, कार्तिक कराड, धनश्री वडीतके, नम्रता जाधव, श्रुतिका पाटील, वैभवी शेटे, आर्या पारे, गौरी गोसावी आदी सहभागी झाले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत